आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपूल:शाळा न्यायाधीकरण बंदच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा आदेश

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर, उस्मानाबाद आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांसाठी सोलापुरात असलेले शाळा न्यायाधीकरण बंद करण्याच्या निर्णयाला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी तात्पुरती स्थगिती दिली. २० मे च्या निर्णयास आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याने १५ दिवसांत स्थगिती मिळाली.

राज्यभर शाळा न्यायाधीकरणांची पुनर्रचना करताना सोलापूरचे न्यायाधीकरण बंद करण्याचा निर्णय झाला होता. सोलापुरात १९९७ मध्ये सुरू झालेल्या या न्यायाधीकरणाच्या कक्षेत लातूर जिल्ह्याचाही समावेश होता. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्याला स्वतंत्र करत नांदेडला जोडून घेतले होते. नव्या पुनर्रचनेत लातूरचे हे न्यायाधीकरण पूर्ववत ठेवून सोलापूरचे बंद करण्याचा निर्णय झाला. त्याला येथील शिक्षक अन् वकील संघटनांनी तीव्र विरोध केला. शिक्षणमंत्री परदेश दौऱ्यावर असल्याने त्यावर निर्णय झाला नव्हता.

आता पुढे काय?
सोलापूरच्या शाळा न्यायाधीकरणात समावेश असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला नव्या पुनर्रचनेत लातूरला जोडले. नगर आणि सोलापूर हे दोन्ही जिल्हे पुण्याच्या शाळा न्ययाधीकरणाला जोडले. दरम्यानच्या काळात या न्यायाधीकरणांचे पीठासीन अधिकारी असलेल्या वरिष्ठस्तर न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या. सोलापूरचे न्यायाधीकरण पूर्ववत ठेवण्यासाठी पुनर्रचनेतील या बाबी बदलाव्या लागतील. त्याचे स्वतंत्र आदेश काढावे लागतील. त्याला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल.

बातम्या आणखी आहेत...