आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनमोल ठेवा:अभ्यास आणि भक्तीच्या जोरावर वस्त्र संशोधक विनय नारकर यांनी बनवली रेशमी नवरंगी शुभराय साडी

सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक भक्तांच्या भक्तीचे स्थान असणाऱ्या शुभराय महाराजांच्या अठराव्या शतकातील चित्रकला आविष्कार हुबेहूब प्रतिकृती साकारत सोलापूरचे युवा वस्त्र संशोधक विनय नारकर यांनी रेशमी नवरंगी शुभराय साडीची निर्मिती केली आहे. या साडीची निर्मिती एक मोठे मुश्किल आणि आव्हानात्मक काम होते. मात्र, अभ्यास आणि भक्तीच्या जोरावर ते काम नारकर यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडले आहे.

अठराव्या शतकातील शुभराय महाराज यांच्या चित्रांचा अभ्यास करुन हुबेहुब तशाच पद्धतीची चित्र रेशमी साडीवर विणून घेण्याच काम विनय नारकर यांनी केले आहे. यात महाराज जेव्हा प्रवास करायचे. तेव्हा ते वेगवेगळ्या चित्रशैलीचा अभ्यास करून त्यातूनही काहीतरी वेग टिपण्याचा प्रयत्न त्यात करत. कृष्णलीला रास लीला , गोपिका सोबतचा कृष्ण वेगवेगळे अवतार अशी चित्र असून त्या चित्रांचे पुस्तक महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले आहे. त्या पुस्तकाचं नाव " शुभ राय महाराज चित्रचिरंतन" असून या पुस्तकाचा अभ्यास करून व इतरही अनेक संदर्भ घेऊन विनय नारकर यांनी या साडीची संकल्पना जन्माला घातली.

महाराष्ट्र शासनाने शुभराय महाराजांची चित्रचिरंतन असे पुस्तक प्रकाशित केले आहे. हा एक अनमोल ठेवा असून याचा प्रचार होणे महत्त्वाचे आहे. असे मनात ठरवून नारकर यांनी हे काम हाती घेतले. जेव्हा ही साडी निर्मित करण्यात आली. तेव्हा शुभांगी बुवा यांना बोलून नारकर यांनी पहिली साडी मठात अर्पण केली. विशेष म्हणजे शुभराय महाराजांनी तयार केलेले निवडक अभंग या साडीच्या पदरावर विणले आहेत. आव्हानात्मक काम होते

महाराजांच्या कलाकृती पाहताना ही चित्र आपण साडीवर उतरवली तर फार सुंदर साडी होऊ शकेल याचा विचार मनात होता. शिवाय या कलाकृतीचा प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे. ते या माध्यमातून करता येईल असा सकारात्मक विचार मनात घेऊन मी हे काम केले हे काम आव्हानात्मक होते. मात्र ते अतिशय कलात्मक पद्धतीने पूर्ण झाले आहे याचा खूप आनंद होतो आहे, असे विनय नारकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...