आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैराग-मोहोळ रस्त्यावर उतारावर एसटीचा ब्रेक फेल झाल्याने चालकाने बस बाजूच्या शेतीत वळवली. त्यामुळे अपघात टळला. बसमध्ये ८० प्रवासी होते. रविवारी दुपारी दाईंगडेवाडी येथील जगदंबा हॉटेलसमोर ही घटना घडली. वैरागहून मोहोळकडे चालक दिगंबर शिंदे हे एसटी बस (एमएच ०६, ८३३९) घेऊन जात होते. दाईंगडेवाडीजवळ उतारावर समोर उसाचा ट्रॅक्टर आल्यामुळे चालकाने ब्रेक दाबून बस थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेक फेल झाल्यानेे बस थांबली नाही. चालकाने प्रसंगावधान राखून चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या शिवारात वळवली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बस वैरागकडून ८० प्रवासी घेऊन मोहोळकडे निघाली होती. दाईंगडेवाडी शिवारात जगदंबा हॉटेलसमोर एसटी बस आली असता समोर उसाचा ट्रॅक्टर आल्याने चालक शिंदे यांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत एसटी रस्त्यालगतच्या माळरान असलेल्या शेतात वळवली. मार्गशीर्ष एकदशीमुळे मराठवाड्यातील भाविक पंढरपूरला जाण्यासाठी मोहोळमार्गे निघाले असल्याने एसटीत गर्दी होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.