आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर:102 वर्षांच्या आजोबाची कोरोनावर मात, शंभरी पार केलेल्या वयात करतात शेतात कामे

माढा2 महिन्यांपूर्वीलेखक: संदीप शिंदे
  • कॉपी लिंक

इच्छा शक्तीच्या आणि प्रतिकार शक्तिच्या जोरावर माढा तालुक्यातील दहिवली गावच्या मुरुलीधर एकनाथ फरड या वयाची शंभरी पार केलेल्या शेतकऱ्याने कोरोनानर मात केली आहे.

माढा तालुक्यातील दहिवली गावचे रहिवासी असलेले मुरुलीधर फरड हे पेशाने शेतकरी असुन ते दिवसभर शेत कामात गुंतलेले असतात. मध्यंतरी अचानक त्यांना अशक्तपणा जाणवु लागल्याने कुटूंबियांनी त्यांना रुग्णालयात नेले होते. तिथे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीतून निष्पन्न झाले. यानंतर 28 ऑगस्टला कुर्डूवाडीतील संकेत मंगल कार्यालयात असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे दाखल झाल्यानंतर फरड यांनी शंभरी पार केलेल्या वयात देखील कोरोनाला हरवले. कोविड केअरसेंटर मध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी घेतलेली विशेष काळजी आणि तातडीने सुरू केलेल्या उपचारामुळे फरड आजोबा बरे झाले.

कोविड केअर सेंटरमधुन घरी जाताना रुग्णांच्या अश्रू अनावर

कोरोना म्हणजे संशयाचा आजार आहे. त्याला हसत खेळत सामोरे जा, आनंदी रहा असा कानमंत्र देऊन मुरलीधर दादा घरी परतले. कुटूंबियांनी देखील त्यांचे औक्षण करीत घरात गोडधोड करुन आनंद साजरा केला. कोरोनाच्या भितीने काळजीत रपडुन राहिलेल्यांना मुरलीधर दादामुळे निश्चितच दहा हत्तीचे बळ मिळेल.

कोरोना बाधित निघाले म्हणुन तणावात न येता, उपचार घेऊन इच्छा शक्ती बाधित रुग्णांनी ठेवायला हवे. मी लहानपणापासुनच व्यायाम तर करीतच आलो, शिवाय दररोज शेतकामात असतो. माझा मुलगा ६५ वर्षाचा आहे, मी शंभरी पार केली आहे. कोरोना विषाणूचा मुकाबला करणे काहीच कठीण नाही. -मुरलीधर फरड,शेतकरी दहिवली

माझ्या शेजारीच मुरलीधर फरड हे आजोबा उपचार घेत होते. ते कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असताना देखील सर्वांना चिंता करत बसू नका, काही होत नाही आपल्याला, असा धिर देत असायचे. मी पहिल्यांदा दाखल झाल्यावर घाबरलो होतो. फरड आजोबामुळे माझी भितीच मरुन गेली.-अमोल वायकुळे,कुर्डूवाडी