आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा मध्यवर्ती बँकेला सावरण्यासाठी प्रशासकीय मंडळ:कारभार आता उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या हाती

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला सावरण्यासाठी प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले होते. त्याच्या प्रमुखपदी शैलेश कोतमीरे यांची निवड करण्यात आली होती. पण गेल्या वर्षभरापासून शैलेश कोतमीरे हे जिल्हा बँकेचा परिवार सोडणार अशी चर्चा रंगत होती, अखेर कोतमीरे यांच्याकडील पदभार सोलापूर जिल्ह्याचे उपनिबंधक कुंदन भोळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भोळे यांच्यासोबत जिल्हा विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी हे आदेश काढले आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेश कोतमीरे यांच्या जागेवर कामकाज पाहण्यासाठी सहकार आयुक्त कवडे यांनी द्विसदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. त्यात प्रशासक कुंदन भोळे असून सदस्य म्हणून डोके यांचा समावेश आहे.

राज्याचे तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी 23 मे 2018 रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहार पाहता संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून तत्कालीन जिल्हा उपनिबंधक देशमुख यांची नियुक्ती केली होती. पाच महिन्यानंतर ऑक्टोबर 2018 पासून अप्पर निबंधक शैलेश कोतमीरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

तब्बल चार वर्षे कामकाज पाहिल्यानंतर कोतमीरे यांच्या जागेवर विद्यमान जिल्हा उपनिबंधक भोळे यांची नियुक्ती झाली आहे. कोतमीरे यांनी चार वर्षात अतिशय चांगले कामकाज करून बँक नावारूपाला आणली आहे, त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये चांगले वातावरण राहिले. यांच्या बदलीला खुद्द कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता

बातम्या आणखी आहेत...