आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:प्रत्येक वारकरी संप्रदायाचे भूषण, हीच परंपरा जतन करण्याचे काम; चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रतिपादन

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी संप्रदायाचे भूषण आहे. हा प्रवाह आहे. त्याचे जतन, संवर्धन करणे हे कार्य आपण करत आहोत. हीच परंपरा जपत आहोत’,असे मत कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केले. श्री संत साहित्य सेवा संघातर्फे श्री. देगलूरकर आणि डॉ. अरुण प्रभुणे यांचा वारकरी संप्रदयातील कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी ते उत्तरादखल बोलत होते. संघाचे संस्थापक द. का. तथा भाऊ थावरे यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम झाला.

हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या सोहळ्यास कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या विश्वस्त डॉ. स्वर्णलता भिशीकर, विश्वासराव जतकर, अविनाश जोग, गणेश थावरे, सविता पोफळे, डॉ. माधवी रायते. संजीव कुसुरकर, प्रमोद कामतकर उपस्थित होते.

श्री. देगलूरकर पुढे म्हणाले की, काही पुरस्कार हे ईश्वर पूजनाच्या स्वरूप असतात. काही पुरस्कार विशिष्ट विचारांची परंपरा असते. जबाबदारी अन् आशीर्वाद असतो. त्यातला एक हा पुरस्कार आहे. ही जबाबदारी मला पुढच्या कार्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. माझं जे जीवन घडलं आहे त्या सगळ्यांचे श्रेय भाऊंचे आहे. अभ्यास आणि पारायण उपासना हे सगळं समजावून सांगण्याचे काम त्यांनी केले. डॉ. प्रभुणे म्हणाले की, मला मधु मंगेश कर्णिक यांनी साहित्याच्या विश्वात विराजमान केले. त्यामुळेच भक्तिमार्गातून साहित्य शब्दसेवा करत आहे,

पुरस्काराची रक्कम कामधेनुला दिली
चैतन्य महाराज देगलूरकर यांनी पुरस्काराचे ५१ हजार रुपये कामधेनु गोशाळेला (बीड) देण्याचे जाहीर केले. याला टाळ्यांनी प्रतिसाद मिळाला.

बातम्या आणखी आहेत...