आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या रचनांचे श्राव्य स्वरूपातील सादरीकरणाचा रसस्वाद सोलापूकरांनी घेतला. सोमवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संगीत विभागातर्फे अॅफी सभागृहात या संगीतमय श्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत विभागाचे मोहन सोहनी व जयंत राळेरासकर यांनी बहरदार निवेदनाद्वारे शांता शेळके यांच्या काव्य गीतांचा नजराणा रसिकांसाठी सादर केला. शाळा शेळके यांच्या रचनेच्या सादरीकरणाबरोबरच रसिकांना पूरक माहितीचा खजिना ही त्यांच्या निवेदनाद्वारे उलगडत राहिला.
श्रीधर फडके यांच्या संगीताचे लेणे घेऊन सजलेले, आशा भोसले यांच्या स्वरातील शांता शेळके यांचे सर्वांगसुंदर असे पहिलेच गाणे सादर झाले, ते होते ऋतू हिरवा.. ऋतू बरवा पाचूचा वनि रुजवा हे गीत. यानंतर नाट्यगीत, कोळीगीत, कविता यांचा सुमारे २० काव्य - गीतांचा गुलदस्ता रसिकांसमोर उलगडत गेला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.