आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • The Best Alternative To Sugarcane Bananas In The Water Belt; Following Malshiras, The Area Under Cultivation In Karmala Taluka Has Tripled In The Years |marathi News

नगदी पीक:पाणीपट्ट्यात उसाला केळीचा उत्तम पर्याय; माळशिरस पाठोपाठ करमाळा तालुक्यात वर्षांत तिपटीने वाढले लागवड क्षेत्र

करमाळा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरेशा पाण्यामुळे पारंपरिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कल आहे. उत्पन्न, दर आणि वाहतुकीच्या सुविधा वाढल्यामुळे ऊस उत्पादक आता केळी उत्पादनाकडे वळत असल्याचे दिसत आहे.

करमाळा तालुक्यात तीनपटीने केळी लागवडीत वाढ झालेली दिसून येत आहे. २०२०-२१ मध्ये हजार हेक्टर क्षेत्र असणारी केळी लागवड २०२२ मध्ये ३ हजार ७७४ हेक्टरपर्यंत गेली आहे, असे कृषी विभाग सांगते.

जिंती ते कंदरपर्यंत विस्तारलेला उजनी धरण जलाशयाचा पट्टा, सीना नदीवरील कोळगाव धरण यावर सुरुवातीला उसाचे क्षेत्र अवलंबून होते. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे यंदा पाणी उपलब्ध झाल्याने ऊस व केळी लागवड क्षेत्र वाढले. दहिगाव ते वरकुटे अशा गावांचा समावेश त्या योजनेत झाला. कायम दुष्काळी भागाला पाणी मिळाले. सीना कोळगाव धरणात कायम पाण्याच्या उपलब्धतेती शाश्वती नव्हती. म्हणून उसाशिवाय इतर पिकांना प्राधान्य दिले जात होते.

यंदा २५ हजार हेक्टर ऊस लागवड असताना केवळ तीनच साखर कारखाने चालू होते. अतिरिक्त ऊस इतरत्र गाळपासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अनेकांचे ऊस शेतातच आहे, काहीचा जळून खाक झाला. यावर्षी जवळपास चाळीस लाख टन ऊस उत्पादित झालेला असताना कमलाईने ७ लाख १५ हजार, मकाईने ३ लाख, भैरवनाथ शुगर विहाळने ५ लाख ५१ हजार अशा १५ लाख टन उसाचे गाळप केले. पुढच्या वर्षी दहा हजार हेक्टर वाढीव ऊस असेल त्यामुळे आणखीन गाळपस्थिती गंभीर असेल.

लागवडीच्या तुलनेत गाळपाचा प्रश्न गंभीर झाल्याची जाणीव झालेले जाणकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कल केळी लागवडीकडे वाढला आहे. २०२१ पर्यंत १०२० हेक्टर केळीची लागवड होती. यंदा तिपटीने वाढ झाली. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने दहिगाव उपसा योजनेचे व सीना कोळगाव धरणातील पाणी पिकांना मिळाले. त्यामुळे उसाची शेती २५ हजार ८३८ वरुन यंदा ३७ हजार ३८७ हेक्टर वर पोहोचली. त्याप्रमाणे केळीची लागवड हजारावरून ३ हजार ७७४ हेक्टरवर गेली.

कोण काय म्हणाले...
संजय वाकडे, कृषी अधिकारी, करमाळा : काळी माती, पाणी व नदी परिसरातील शेतीमुळे केळीला पोषक वातावरण आहे. उसाला लागणारी शेती केळीसाठी उपयुक्त असते. त्यामुळे पर्यायी पीक म्हणून अनेक शेतकरी केळी शेतीकडे वळू लागले आहेत. कमी वेळेत एकरी अधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळत असल्याने केळी शेती फायद्याची ठरत आहे. पोषक वातावरण, दर, एक्स्पोर्ट सुविधा, कोल्ड स्टोअरेज स्ट्रक्चर आदी गोष्टींमुळे शेतकऱ्यांचा कल केळी उत्पादनाकडे वाढत आहे. उसाला पर्यायी नगदी पीक म्हणून केळीकडे बघायला हरकत नाही. दर हेक्टरी उसाच्या तुलनेत उत्पादन अधिक आणि उत्पन्न वाढ होत असल्यामुळे केळी उत्तम पर्याय आहे.

तोहिद मुलाणी, केळी उत्पादक, महाळुंग : साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूरची राज्यात ओळख असताना आता सोलापूर जिल्हा केळी उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. केळीसाठी आवश्यक वातावरण व जमिनीची सुपीकता असल्याने केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. पॅकिंग हाऊस कोल्ड स्टोरेज यासारख्या सुविधा व राष्ट्रीय महामार्गांचे जाळे उपलब्ध झाल्याने केळी निर्यातीलाही चालना मिळत आहे. जिल्ह्यातील केळीला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. जिल्ह्यात देशी केळी लावण्याकडेही कल वाढत आहे. केळीचे पहिले पीक ११ महिन्यात व तेथून पुढे ८ महिन्यात खोडव्याचे पीक असे १९ महिन्यात दोन पिके येतात त्यामुळे केळी पासून चांगले उत्पन्न मिळत आहे.

उन्हाच्या कडक झळा बसतात त्या दिशेला लाकडी काठ्यांचा आधार घेऊन १२ बाय १५ इंच आकाराचे हे कापड बसवून केळीच्या रोपांना सावली केली. दीड एकर क्षेत्रात जी ९ या वाणाची १ हजार ७०० केळीची रोपे लावली आहेत. प्रति रोप १६ रुपये ७५ पैशांनी मिळाले. कापडाचा प्रति रोप खर्च एक रुपया आला. कापड लावण्यासाठी मजुरी खर्च प्रत्येकी दोन रुपये आला. त्यामुळे ४३ अंश तापमानातही रोपे जोमाने वाढत आहेत.

बातम्या आणखी आहेत...