आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री विठ्ठल आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी या दोन्ही साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर आलेली असताना विठ्ठल परिवारातील काळे-भालके यांच्या नेतृत्वाविरोधात नाराजी उफाळून येत आहे. याचा फटका काळे-भालके गटांना बसण्याची शक्यता वर्तवली आहे. एकीकडे काही संचालकांना भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली काम करणे अशक्य वाटते. दुसरीकडे कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वावर नाराज संचालक विरोधी गोटात सहभागी झाले. यावरून विठ्ठल आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
पंढरपूर तालुक्यात विठ्ठल परिवार ही मोठी राजकीय ताकद आहे. माजी आमदार कर्मयोगी औदुंबरअण्णा पाटील, सहकार शिरोमणी वसंतराव काळे, यशवंतभाऊ पाटील, दिवंगत आमदार भारत भालके, राजूबापू पाटील यांनी मागील चार दशकात हा परिवार मजबुतीने उभा केला आणि राजकीय, आर्थिक, सहकार क्षेत्रात एक सक्षम पर्याय दिला.
या नेत्यांच्या वारसांनी विठ्ठल परिवार आपली कौटुंबिक मालमत्ता असल्याचे गृहीत धरून वाटचाल सुरू ठेवली आहे. विशेषतः भारत भालके, राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवार सैरभैर झाला आहे. परिवारास सावरण्याची क्षमता कल्याणराव काळे आणि भगीरथ भालके, युवराज पाटील यांच्याकडे नाही, असे विठ्ठल, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक उघडपणे बोलत आहेत.
धाराशिव शुगर्सचे प्रमुख अभिजित पाटील यांनी विठ्ठलच्या निवडणुकीचे रान उठवले आहे. विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांची काहीच हालचाल दिसत नाही. विठ्ठलचे संचालक, सभासद, कार्यकर्ते यांना अंधारात ठेवून भगीरथ भालके यांनी मागील हंगामात विठ्ठल कारखाना बंद ठेवला. शेतकऱ्यांचे, कामगारांचे, ऊस तोडणी, वाहतूकदारांचे कारोडो रुपये देणे थकवले आहे. कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वावरही सर्वांची नाराजी आहे.
सहकार शिरोमणीचे पाच संचालक काळे यांच्या विरोधात काम करीत आहेत. समर्थक अभिजित पाटील आणि अॅड. दीपक पवार यांच्यासाठी काम करत आहेत. काळे कारखाना यंदा सुरू झाला. सीताराम या खासगी साखर कारखान्यासाठी वसूल केलेले शेतकऱ्यांचे भागभांडवलही दिले नाही. अतिरिक्त ऊस झाल्याने नाईलाजाने चालू हंगामात शेतकऱ्यांनी सहकार शिरोमणीला ऊस दिला. मात्र त्या ऊस बिलापोटी ३६ कोटी रुपये थकवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.