आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेगाव ते हत्तूर हा बावीस किमीचा बाह्यवळण मार्ग तयार करून ३५ दिवसच झालेले असताना हा रस्ता उखडला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सोलापूर ते विजापूर हा ११० किलोमीटरच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आला. या महामार्गाचे लोकार्पण २५ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ३५ दिवस उलटत नाही तोपर्यंत हा बाह्यवळण रस्ता उखडल्याचे चित्र आहे. या बाह्यवळणावर हिरज येथे रेल्वे पूल आणि नदीवरील एक मोठा पूल उभारण्यात आला आहे. तसेच अंतर्गत वाहतुकीसाठी पाच भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. हा बाह्यवळण रस्ता खूप सुंदर तयार झाला होता. मात्र अवघ्या काही दिवसांतच रस्ता उखडला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित मक्तेदाराकडून याची दुरुस्ती तत्काळ करून घेणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.