आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:पंचांच्या निर्णयावर खेळाडूंची कारकीर्द अवलंबून; महेश गादेकर यांचे प्रतिपादन

सोलापूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खो खो स्पर्धेत पंचांना क्षणात निर्णय घ्यावे लागतात. त्यांच्या एका निर्णयावर खेळाडूंची कारकीर्द अवलंबून असते. त्यामुळे पंचांनी त्यांचा निर्णय अचूक द्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर यांनी केले.

राज्य खो खो पंच परीक्षेतील उत्तीर्ण परीक्षार्थींना प्रमाणपत्र वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदक प्राप्त वाडीकुरोलीच्या प्रीती काळे हिचा घड्याळ देऊन सत्कार करण्यात आला. हॉटेल सिटी पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, न्यू सोलापूर क्लबचे अध्यक्ष मनोज संगावार, जगन्नाथ व्यवहारे व राम साठे आदी उपस्थित होते. यावेळी राज्य खो खो पंच शिबिरात सहकार्य करणाऱ्या विजय तडसरे, रवींद्र नाशिककर, सुरेश भोसले, गोकुळ कांबळे, संतोष कदम, राजू शितोळे, युसुफ शेख, प्रथमेश हिरापुरे व आनंद जगताप यांचा विशेष सत्कार करण्यात आला. खजिनदार श्रीरंग बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...