आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण सोडत पूर्ण:सोलापूरमध्ये नगर परिषद प्रारूप मतदार यादी मंगळवारी होणार प्रसिद्ध

सोलापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील नगर परिषदांची आरक्षण सोडत कार्यक्रम पूर्ण झाली असून, सध्या आरक्षणावर हरकती व सूचना मागवल्या आहेत. मंगळवारी (२१ जून) सर्व नगरपरिषदांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर त्यावर हरकती, सूचना मागवण्यात येणार आहेत, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाचे सहआयुक्त एन. के. पाटील यांनी दिली.

केंद्रनिहाय मतदार यादी

पाटील म्हणाले, “प्रारूप मतदार यादीवरील सूचनांचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून अभिप्राय देण्यात येईल. त्यानंतर १ जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ जुलैला मतदार केंद्रानिहाय मतदार यादी प्रसिद्ध होईल. नगर परिषदांची अंतिम प्रभाग रचना गुरुवारी (९ जून) प्रसिद्ध झाली. मंगळवेढा, कुर्डूवाडी, बार्शी, मोहोळ मधील काही प्रभाग रचनेत बदल झाले आहेत. पंढरपूर, अक्कलकोट, अकलूज, सांगोला, करमाळा, कुर्डूवाडी, मैंदर्गी, दुधनी नगर परिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देऊन निवडणूक आयोग तसेच विभागीय आयुक्तांकडून जाहीर झाले आहे.

एकूण ४६ हरकती

मुदत संपलेल्या जिल्ह्यातील दहा आणि नव्याने स्थापन झालेल्या अकलूज नगर परिषदांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर दाखल झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सुनावणी घेतली. नगर परिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण ४६ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यानंतर शंभरकर यांनी त्यांच्या अभिप्रायासह विभागीय आयुक्तांकडे प्रभाग रचनेचा प्रस्ताव पाठवलेला होता. विभागीय आयुक्तांनी तसेच निवडणूक आयोगाने नगर परिषदांचा अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आला असून, त्यानंतर आता मतदान केंद्रानिहाय प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे.

२९ जूनला आरक्षणाला मान्यता

१० जूनला आरक्षण सोडतीची नोटीस प्रसिद्ध असून १३ जूनला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला. बुधवारी, १५ जूनला हरकती व सूचना मागवण्यासाठी नोटीस होईल. १५ ते २१ जूनपर्यंत नागरिकांना आरक्षणावर हरकती व सूचना मांडता येईल. त्यानंतर २४ जूनला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे त्यांच्या अभिप्रायासह विभागीय आयुक्तांकडे हरकती पाठवणार आहेत. २९ जूनला विभागीय आयुक्तांकडून आरक्षणाला अंतिम मान्यता मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...