आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा शिडकावा:शहरात रात्री पावसाचा शिडकावा,दहा मिनिटांच्या सरीने गारवा दिला

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडक उन्हामुळे दिवसभर हैराण सोलापूकरांना रात्री नऊच्या सुमारास अवकाळी पावसाने काहीसा गारवा दिला. सुमारे दहा मिनिटे शिडकावा झाला. नंतर पुन्हा काही वेळ उकाडा जाणवला.

शहर व परिसराच्या बहुतांश भागात हा पाऊस पडला. भारतीय हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा येथे मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

उन्हाळ्यातील तापमान पाहता विदर्भ भागातील अकोला येथे राज्यातील सर्वांत जास्त म्हणजे ४४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. तर नाशिक येथे १९.२ इतके किमान तापमानाची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्राचे तापमानाचा आढावा घेतला तर मालेगाव येथे ४३ अंश, सोलापूर ४१.६ व लोहगाव येथे ३९.९ अंश तापमान नोंदले गेले आहे. शहरात रात्री नऊच्या सुमारास पाऊस झाल्याने रस्ते ओले झाले.

उन्हाळ्यातील तापमान पाहता विदर्भ भागातील अकोला येथे राज्यातील सर्वांत जास्त म्हणजे ४४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. तर नाशिक येथे १९.२ इतके किमान तापमानाची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्राचे तापमानाचा आढावा घेतला तर मालेगाव येथे ४३ अंश, सोलापूर ४१.६ व लोहगाव येथे ३९.९ अंश तापमान नोंदले गेले आहे.

४० अंशापेक्षा जास्त तापमान असलेल्या जिल्ह्यामध्ये मालेगाव, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिम व वर्धा यांचा समावेश आहे. तर मुंबई, सांताक्रुझ, अलिबाग, रत्नागिरी, पणजी व डहाणू येथे ३१ ते ३३ अंशाच्या दरम्यान तापमान राहिले.

बातम्या आणखी आहेत...