आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘होटगी रोडवरील सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीविषयी लेखी म्हणणे सादर केले आहे. नागरी विमानसेवा संचालकांनी (डीजीसीए) चिमणी पाडण्याची घाई करू नका असे म्हटले आहे. परत सर्व्हे करा, असा निकाल दिला आहे. हायकोर्टाने सांगितले की, डीजीसीचा निर्णय पूर्ण झाल्याशिवाय महापालिकेने काही करू नये. या दोन्ही गोष्टी लेखी स्वरूपात देऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले. ऊस गाळपाचा हंगाम सुरू आहे गडबड करू नये, असे म्हणणे मांडल्याची माहिती माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
कारखान्याच्या विनापरवाना बांधण्यात आलेल्या चिमणी प्रकरणी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडे सोमवारी सुनावणी झाली. लेखी निवेदन मिळाले असून सुनावणी पूर्ण झाली आहे. यावर आयुक्तांनी निकाल राखून ठेवला आहे.सिध्देश्वर कारखाना चिमणीबाबत सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.
त्यानुसार आयुक्त असताना पी. शिवशंकर यांनी कारखाना प्रशासनास नोटीस दिली होती. दरम्यान त्यांची बदली झाली. नूतन आयुक्त तेली-उगले यांनी पदभार घेतला. सोमवारी सुनावणीसाठी कारखान्याकडून माजी चेअरमन धर्मराज काडादींसह कारखान्याचे अधिकारी आले. लेखी म्हणणे सादर केले. निर्णय लवकरच देऊ, असे आयुक्त शीतल तेली-उगले म्हणाल्या.
वीरशैव व्हीजनचा ‘सिद्धेश्वर’ला पाठिंबा, काडादी यांना दिले पत्र
वीरशैव व्हीजनने कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांना पाठिंब्याचे पत्र दिले. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले म्हणाले, “वीरशैव समाज हा संयमी, सहनशील, सोशिक आणि उद्यमशील आहे. सिद्धेश्वर कारखाना ही वीरशैवांची अस्मिता आहे. त्याच्याशी खेळ करण्याचा प्रकार कोणीही करू नये. केल्यास वीरशैव समाज स्वस्थ बसणार नाही.” या वेळी चिदानंद मुस्तारे, सिद्राम बिराजदार, नागेश बडदाळ, संजय साखरे, विजयकुमार बिराजदार, शिवानंद सावळगी आदी होते.
नोटीसविषयी वकिलामार्फत पोलिसांना उत्तर पाठवले आहे
पिस्तुल दाखवल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांनी केतन शहा यांना नोटीस दिले. त्याचे उत्तर शहा यांनी वकीलामार्फत दिले असे शहा म्हणाले. ते मिळाले नाही, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिस पुढे काय करवाई करतात ते महत्वाचे आहे. विमान सेवेबाबत सोलापूर विकास मंचच्या वतीने आंदोलन सुरु आहे. याबाबत मंच आपली भूमिका मंगळवारी सादर करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.