आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ‘कमवा व शिका’ ही तत्त्वप्रणाली आचरणात आणल्यामुळे बहुजन समाजातील विद्यार्थी घडले आणि समाजात अमूलाग्र बदल होत गेला. या बदलामुळे पुरोगामी महाराष्ट्राची निर्मिती झाली, असे मत महापालिकेचे सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत यांनी व्यक्त केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सम्राट चौकातील कर्मवीरांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर रयत शिक्षण संकुलाच्या कर्मलक्ष्मी सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कर्मवीरांमुळे वंचित उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांबरोबरच शेतकरी, शेतमजूर आणि अठरा पगड जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळाले, ते अधिकारी पदावर कार्य करत असून राज्याचा विकासात त्यांची मोलाची साथ आहे.
अध्यक्षस्थानी नगरसेवक आनंद चंदनशिवे होते. व्यासपीठावर प्राचार्य हरिभाऊ ढवळे, केतन शहा, इंद्रमल जैन, जयचंद वेद, गौतम संचेती, मंजूनाथ उपाध्ये, डॉ. श्रीकांत येळगावकर, नितीन अणवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सम्राट चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसराचे सुशोभीकरण केल्याबद्दल नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचे आभार मानण्यात आले. प्रास्ताविक वसंत नागणे यांनी केले. आभार संजय जोशी यांनी मानले. राहुल कांबळे, संतोष वालवडकर, अझहर शेख, महावीर आळंदकर, सुनीता पाटील, गौतम शिंदे यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, प्रा. उत्तमराव हुंडेकर, डॉ शहाजी देशमुख, राजन दीक्षित, चंद्रकांत घुले उपस्थित होते.
महानगरपालिका
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त सम्राट चौक येथील पुतळ्यास साहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, केतन शहा, महावीर आळंदकर, श्रीकांत येळेगांवकर, सुनीता पाटील इंद्रमल जैन, जैनचंद वेद, गौतम संचती, प्रतिभा भोसले, राहुल कांबळे, गणेश उपाध्ये, वसंत नागणे मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यसनमुक्ती सेल व उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष शिवराज विभुते यांच्याकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व्यसनमुक्ती सेल अध्यक्ष ज्योतिबा सौदागर गुंड, प्रीती चतुर, अक्षय जाधव, मुदस्सर बागवान, कयूम पठाण, श्रावण धवाळगी आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.