आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:काँग्रेसचे शंकर म्हेत्रेंसह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील ऐश्वर्या वॉटर प्लांट येथे अपहार केलेले पैशाची मागणी करून सतत शिवीगाळ, दमदाटी केली. त्या त्रासाला कंटाळून रेवणसिद्ध सोन्नंद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अशी फिर्याद दक्षिण पोलिस ठाणे अक्कलकोट येथे सोमवारी दाखल झाली असून, याबाबत शंकर म्हेत्रे व गुरुशांत कोलाटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

रेवणसिद्ध मल्लिनाथ सोन्नद (वय ४०, रा. दुधनी) यांनी १० जुलै २०२२ रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास दुधनीच्या ऐश्वर्या वॉटर प्लांटच्या आवारात विषारी औषध पिले. त्यांना उपचारास कुंभारीतील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा १२ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

याबाबत दक्षिण पोलिस ठाण्यात सोमवारी शंकर सातलिंगप्पा म्हेत्रे व गुरुशांत कोलाटी (रा. दुधनी) हे दोघे रेवणसिद्ध यास वेळोवेळी ऐश्वर्या वॉटर प्लांट येथे अपहार केलेले पैशाची मागणी करून त्यास शिवीगाळ, दमदाटी करत असल्याने त्रासाला कंटाळून रेवणसिद्ध याने विषारी औषध पिले होते, अशी फिर्याद काशिनाथ यरगल यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...