आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:भीमसैनिकांचा आक्रोश; मंत्री पाटील, राज्यपालांना हटवण्याची मागणी

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी दुपारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिकांचा आक्रोश पाहायला मिळाला. मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करा आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची उचलबांगडी करा, अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाने मोर्चाचे आयोजन केले होते. बुधवार पेठेतून निघालेल्या मोर्चात आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, पुरुषोत्तम बरडे, चेतन नरोटे, माऊली पवार, श्रीकांत डांगे, राजन जाधव, नाना मस्के, प्रमोद गायकवाड, विजयकुमार हत्तुरे, रॉकी बंगाळे, केरू जाधव, एन. के. क्षीरसागर, दशरथ कसबे आदी सहभागी झाले.

या आहेत प्रमुख मागण्या
महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांची सुटका होऊ नये असा कायदा करावा. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्राॅसिटी कायद्याखाली कारवाई व्हावी, राज्यपाल कोश्यारी यांची उचलबांगडी करावी. अधिवेशनातील पेनवरील बंदी उठवावी, आमदार राम कदम यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवले. तसेच शिष्टमंडळाने हे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

कोण काय म्हणाले
भाजपवाल्यांनी आजपर्यंत शिवशक्ती आणि भीमशक्तीत वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजली. आपला आक्रोश आता आपण मतपेटीतून दाखऊ.''-पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख शिवसेना, ठाकरे गट

सोलापूर चळवळीचा बालेकिल्ला आहे. महापुरुषांचा अवमान सोलापूरकर कधीही सहन करणार नाहीत. लोकशाही पद्धतीने आम्ही लढा देऊ. आमच्या संयमाचा अंत पाहू नये.''-आनंद चंदनशिवे, भीमसैनिक

बातम्या आणखी आहेत...