आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुलिवंदन उत्सव शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. हा उत्सव बंजारा समाजात प्रामुख्याने उत्साहाने साजरा करतात. यासाठी सर्वजण एकत्र येतात. मंगळवारी सायंकाळी नेहरू नगर येथे समाज बांधव एकत्र आले. होळी पेटविली. त्यावेळी प्रथम महिलांनी बंजारा समाजाचा नृत्यांचा फेरा धरला. यावेळी सुख व समृध्दीसाठी प्रार्थना करण्यात आली. समाजातील नायकांनी तरुणांसह सर्वांना संस्काराचे धडे दिले. तंटे करू नका, भावकीत एकोप्याने राहण्याचा सल्ला दिला. महिलांचे पारंपरिक नृत्य आणि पुरुषांच्या लेंगीतून (गाणे) समाजाच्या संस्कृ तीचे दर्शन घडले.
बंजारा समाजाच्या वतीने नेहरु नगर येथील जागृती विद्यालयासमोर धुलिवंदननिमित्त सामुदायिक होळीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्ताने समाजात मागील वर्षभर जन्मलेल्या मुलांचे सामूदायिक नामकरण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी कार्यक्रम ठिकाणी येऊन परंपरेप्रमाणे पूर्ण खोबरे दिले गेले. धान्य घेऊन समाजातील मंडळी येथे आले होते. ज्या तरुणांचे लग्न ठरले, ते पुढील वर्षात विवाहबध्द होणार आहेत. त्या तुरुणांना समाजातील महिलांनी शुभेच्छा देत संतती प्राप्तीच्या शुभेच्छा दिल्या.
नेहरू नगर, कमला नगरात उत्साह नेहरु नगर येथे सायंकाळी महिलांचे बंजारा नृत्य व गाणी झाल्यानंतर रात्री पुरुषांचा लेंगी कार्यक्रम पार पाडला. नाईक नगर, नेहरु नगर, कमला नगर आदी भागातून मानाचे ध्वज आणि नगारा आणण्यात आला होता.
नवचैतन्याने जगा भावकीत भांडणे करू नका. दु:ख विसरून नवचैतन्य निर्माण करा, असा सल्ला होळी कार्यक्रमानिमित्त समाजातील नायकांनी दिला. होळी कार्यक्रमास समाजातील नायक धनसिंग रजपूत, राम जाधव, रेवणसिध्द जाधव, धनसिंग राठोड, माणिक राठोड, लाला राठोड, राम पवार आदी उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.