आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णायक:विद्यापीठ सिनेट सत्ता केंद्राचे झालेले‎ विकेंद्रीकरण लोकशाहीसाठी पूरक‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ‎ सिनेट सभागृहात विविध सदस्यांची संख्या लक्षात घेतली तर‎ सदस्य संख्येचे विकेंद्रीकरण झालेले दिसून येईल. कोणत्याही‎ संघटनेला इतर संघटनांशी विचारविनिमय केल्याशिवाय किंवा‎ मिळवून घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दिसून आले.‎ सिनेट सभागृहात विद्यापीठ टीचर्स असोसिएशन, प्राचार्य‎ संघटना, संस्थाचालक संघटना, विद्यापीठ विकास मंच, वालचंद‎ शिक्षण समूह , विद्यापीठ अधिकारी आणि राज्यपाल नियुक्त‎ सदस्य अशा विविध गटांत सिनेट सदस्यांचा गट किंवा संख्या‎ विखुरलेली िदसून येईल. त्यातही सुटा, प्राचार्य संघटना व‎ संस्थाचालक संघटना यांनी एकत्रित राहून ताकद वाढविली व‎ आपापल्या प्रभाव क्षेत्रातील सदस्यांची मतेही खेचून घेतली.‎ विद्यापीठ प्रशासन व अधिकारी यांची मते तसेच वालचंद शिक्षण‎ समूहाची मतेही निर्णायक ठरली.‎

बातम्या आणखी आहेत...