आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भाजपने व्हीप बजावून केला होता ठराव

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धेश्वर साखर कारखाना चिमणी पाडकामाचे टेंडर महापालिका सभागृहात काँग्रेसने एकमताने मंजूर केल्याच्या तत्कालीन सभागृह नेते शिवानंद पाटील यांच्या उत्तरावर काँग्रस शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी पलटवार केला आहे. चिमणी पाडकामाबाबत भाजपमध्ये दाेन गट हाेते. पक्षातून विरोध असतानाही व्हीप बजावून बहुमताने ठराव करण्यात आला. परंतु भाजपाचे पदाधिकारी खोटे बोल पण रेटून बोल, या म्हणीप्रमाणे वागत असल्याचा निशाणा चेतन नरोटे यांनी साधला.

कारखाना चिमणीच्या समर्थनार्थ निघालेल्या माेर्चात काँग्रेसचे नूतन शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी थेट भारतीय जनता पक्ष व तत्कालीन सभागृह नेत्यांवर हल्लाबाेल केला. यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.

चिमणी पाडकामाचे टेंडर तत्कालीन सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी एकमताने झाल्याचे माध्यमांना सांगितले. त्यावर नराेटे यांनी पाटील यांच्या व्यक्तव्याला आक्षेप घेतला आहे. नरोटे म्हणाले, एजन्सी नियुक्ती टेंडरचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला हाेता. चिमणी पाडकामाबाबत भाजप पक्षातच विरोध असताना व्हीप बजावून बहुमताने ठराव करण्यात आला, ही वस्तुस्थिती असताना विरोधी पक्षास नावे ठेवून राजकीय पोळी भाजून घेत आहेत.

आमदार देशमुख मांडणार भूमिका
चिमणीच्या बाबतीत होम मैदान येथे धर्मराज काडादी यांनी नाव न घेता आमदार विजय देशमुख यांच्यावर निशाणा साधल्याने याबाबत आमदार देशमुख हे आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे माजी सभागृह नेता शिवानंद पाटील यांनी सांगितले.

भाजप कोरम तोडणार होता
पालिका सभागृहात चिमणी पाडकाम टेंडर आले असताना, त्यास भाजपच्या नगरसेवकांनी विराेध केला. त्यामुळे भाजपने व्हीप बजावला. गोंधळात बहुमताने प्रस्ताव करून आता काँग्रेसवर निशाणा साधला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...