आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चित्रकला ग्रेड परीक्षा एप्रिलमध्ये होणार, इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट देता येणार

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रकला ग्रेड परीक्षेची संधी नववी व दहावीतील विद्यार्थ्यांसाठीही उपलब्ध झाली आहे. कला संचालनालयातून मिळालेल्या माहितीनुसार नववीतील विद्यार्थ्यांसाठी एलिमेंट्री परीक्षा देता येईल. यावर्षी दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना थेट इंटरमिजिएट परीक्षा देता येईल. ही चित्रकला ग्रेड परीक्षा ९ ते १२ एप्रिल या कालावधीत होणार आहे.

अखील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाने यासाठी प्रयत्न केले. एलिमेंटरी परीक्षा ही फक्त नववी मध्ये जे विद्यार्थी असतील त्यांनीच द्यायची आहे. इयत्ता सातवी किंवा आठवीमधील जे विद्यार्थी या एलिमेंटरी परीक्षेला बसू इच्छितात त्यांची परीक्षा सप्टेंबर महिन्यात पुढे घेण्यात येईल तोपर्यंत त्यांनी फॉर्म भरू नये, असे कला शिक्षक संघाने कळविले आहे. अधिक माहितीसाठी राज्य कलासंचालनालयातील संकेतस्थळावरील माहिती पहावी. सातवी व आठवीतील ज्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी परीक्षांसाठी नावे दिली आहेत. त्यांच्या परीक्षा संप्टेबर २०२२ मध्ये व नववीतील विद्यार्थी दहावीत गेल्यावर इंटरमिजिएट परीक्षा देऊ शकतील. या परीक्षा नोंदणी व फी प्रक्रिया ऑनलाईन होईल मात्र परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन होणार आहेत.

नोंदणी केंद्रामार्फत ऑनलाइनच होईल : कलाशिक्षकांनी विद्यार्थ्यांचे नाव व इतर माहिती व्यवस्थित अल्फाबेट, कॅपिटल रोमन लिपी, स्पेलिंग चेक करून जुन्या पद्धतीने फार्म भरून तसेच केंद्राच्या सोयी प्रमाणे टाईप करून पेनड्राईव्ह किंवा सीडी च्या माध्यमातून द्यावे, अशी माहिती राज्य कला शिक्षक संघाचे अध्यक्ष शेरशहा डोंगरी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...