आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून पाणी पळवण्याचा बारामतीकरांचा अट्टाहास अजून संपलेला नाही. या योजनेची ३० डिसेंबर रोजी निविदा निघाली. सध्याच्या सरकारनेही निविदा काढून त्याला खतपाणी घातले आहे. त्याच्या विरोधात मंगळवारी बैठक घेऊ, असे अतुल खुपसे-पाटील यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी २१८७९.०३ लाख रुपयांची निविदा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे १९ अंतर्गत कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्रमांक ८ सोलापूर यांनी काढली अाहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेला अट्टाहास सध्याचे भाजप-शिवसेना सरकार पूर्ण करत असल्याचे दिसून येत आहे. याच अनुषंगाने इंदापूरला जाणारे उजनीचे पाणी वाचले पाहिजे, यासाठी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची मंगळवारी (दि. ३) सकाळी ११ वाजता मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित केली असल्याचे खुपसे यांनी सांगितले.
सचिव माउली हळणवर म्हणाले, बारामतीकरांनी उजनीचे पाणी पळवण्याचा घाट घातला असून, तो आणि म्हणून पाडला आहे. तरीही तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सोलापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसून या संदर्भात प्रक्रिया सुरूच ठेवली. याला भाजप शिवसेना सरकारने खतपाणी घालत ई-निविदा प्रक्रिया टेंडर नोटीस वर्तमानपत्रात जाहीर केली, हे अत्यंत खेदजनक आहे. त्यामुळे सरकार कोणाचेही असले तर आम्ही शांत बसणार नसल्याचे नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.