आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:उत्कृष्ट बांधकाम प्रकल्पांचा केला गौरव, हॉटेल बालाजी सरोवर प्रिमियरमध्ये हा कार्यक्रम झाला

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स सोलापूर या संस्थेच्या वतीने उत्कृष्ट बांधकाम प्रकल्पांचा गौरव करण्यात आला. स्वतंत्र बंगला, अपार्टमेंट, सरकारी इमारत आणि व्यापारी संकुल या प्रकारातील उत्कृष्ट प्रकल्प निवडण्यात आले होते.

हॉटेल बालाजी सरोवर प्रिमियरमध्ये हा कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. एस. एल. हलकुडे, अल्ट्राटेक सिमेंटचे विभागीय प्रमुख अरविंद महाजन, तांत्रिक प्रमुख जयेश परमार, आशिष भुरे, उदयसिंग बिसेन, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, सोलापूरचे अध्यक्ष अमोल मेहता, सचिव बी. एम. जाधव आदी उपस्थित होते.

वास्तुरचनाकार गिरीश कुलकर्णी, स्थापत्य अभियंता परिमल शहा, अभिनव साळुंखे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ममता बोल्ली यांनी सूत्रसंचालन केले. श्री. बिसेन यांनी आभार मानले. या वेळी महादेव बाळगी, शंतनू चंदा, प्रशांत मोरे, सिद्धाराम कोरे, प्रकाश तोरवी, इफ्तेखार नदाफ, किरण कदम, विनायक जोशी, मनोज म्हेत्रेस, सचिन भुजबळ, शीतल सिंदखेडे आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट प्रकल्प असे दोन हजार चौरस फुटापर्यंतचा बंगला या विभागात हनुमान निवास व नरोणे रेसिडेन्सी यांना विभागून पुरस्कार देण्यात आला. दोन हजार चौरस फुटापेक्षा मोठा बंगला या विभागात श्री श्री वैष्णवी यांना पुरस्कार मिळाला. रेसिडेन्शिअल अपार्टमेंट या विभागात महावीर विहार (बार्शी) यांना तर पब्लिक बिल्डिंग विभागात सिटी सेंटर टॉवरला गौरवण्यात आले. शॉवर अँड टॉवर वॉटर पार्कचा विशेष पुरस्काराने गौरव झाला. औद्योगिक इमारतीच्या प्रकारात अल्कोन इंडस्ट्रीजला गौरवले.

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, सोलापूरच्या वतीने उत्कृष्ट बांधकाम प्रकल्पांचा गौरव करण्याचा कार्यक्रम झाल. त्याच्या उद्घाटनप्रसंगी अरविंद महाजन, जयेश परमार, आशिष भूरे, उदयसिंग बिसेन, अमोल मेहता, बी. एम. जाधव.

बातम्या आणखी आहेत...