आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऊसाचे आगार म्हणून ओळख असणाऱ्या करमाळा तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रात केळी, पपई,पेरू अशा फळबागांचे क्षेत्र वाढत चालले आहे. विषेश म्हणजे सध्या वाशिंबे, ता. करमाळा परिसरात साध्या केळीसह दक्षिण भारतात पिकणारी वेलची केळीचे उत्पादन घेतले जात आहे. करमाळा तालुक्यात दहा हजार एकरावर जी-नाईन केळीचे उत्पादन घेतले जात आहे. येथील केळीला उत्तर भारतासह आखाती देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. उजनी धरणाची निर्मिती झाल्यापासून या परिसरात उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांसह पुणे, अहमदनगर येथील कारखान्याना उजनी लाभक्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात ऊसाचा पुरवठा होतो. बदलत्या काळात उत्पादन खर्च व त्या तुलनेत मिळणारा दर सतत एकाच पिकाचे उत्पादन घेतल्याने जमिनी क्षारपड झाल्या. जमिनी ऊस गाळपासाठी होणाऱ्या त्रासायामुळे शेतकऱ्यानी फळ पिकांना पसंती दिली आहे. यावर्षी करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात फळ पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये वाशिंबे ता. करमाळा शिवारात दक्षिण भारतातील पिकणारे वेलची केळीचे वाण लागवडीचा प्रयोग शेतकऱ्यानी यशस्वी केला आहे.
या वाणाची २०० एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. चांगल्या पिक उत्पादन व्यवस्थापनामुळे दर्जेदार उत्पादन घेतल्यामुळे या पिकाची व्यापाऱ्यांकडून बांधावरच खरेदी केली जात आहे. मोठ्या शहरातील तारांकित हॉटेल्स आणि मॉलमध्ये या केळीची प्रामुख्याने विक्री होते. जवळपास ४० ते ८० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर केळी उत्पादकांना मिळत आहे.
उसाच्या तुलनेत एकरी उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे. अभिजीत पाटील ( वेलची केळी उत्पादक, वाशिंबे ता. करमाळा) जानेवारी २०२२ रोजी चार एकर क्षेत्रात सात बाय पाच अंतर ठेवून ५००० वेलची केळी रोपांची लागवड केली. काढणीस आलेल्या ३५ टन मालाची विक्री करण्यात आली आहे. सरासरी ५० ते ५५ रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळाला आहे. वेलची केळीचा पहिला व खोडवा केळीचा दर एकच आहे. साध्या केळीवर थंडीत चिलींगचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, परंतु वेलची केळी चिलींगला बळी पडत नाही.
कृषी अधिकारी म्हणाले, शेतक ऱ्याना फायदेशीर
करमाळा तालुक्यात जी नाईन केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. ऊस व पारंपरिक पिकाला पर्याय म्हणून केळी लागवड करण्यात येते. वेलची केळीची ऊत्पादकता कमी असली तरी त्यातील पौष्टिकता लक्षात घेता प्रति किलो ४० ते ८० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. शेतकऱ्यानी जमिनीचा व बाजारपेठेचा अभ्यास करुन लागवड केल्यास निश्चित फायदा होईल. -संजय वाकडे, तालुका, कृषी अधिकारी करमाळा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.