आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्रदानासाठी संमती पत्र:318 दानशूरांच्या डोळ्यांनी दिली 368 जणांना नवी दृष्टी ; अंधत्व निवारण समितीकडून जनजागृती

सोलापूर / रमेश पवार23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा अंधत्व निवारण समितीकडून सध्या शाळा, महाविद्यालयांमध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती केली जात आहे. मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील ३१८ जणांनी ६३६ बुबुळ दान केले. त्यातून ३६८ जणांना दृष्टी मिळाली. दानशूरांनी केलेल्या नेत्रदानातून दिव्यांगांच्या जीवनातील अंधार दूर करत त्यांना सृष्टी पाहता आली. या दातृत्वाने २०५ पुरुष व १६३ महिलांना नव्याने दृष्टी प्राप्त झाली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग व सोलापूर जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती यांच्याकडून नेत्रदानाविषयी जनजागृती केली जात आहे. नियंत्रण समितीकडून वर्षभर नेत्रदान करणाऱ्यांची नोंदणी करून घेतली जात आहे. कोरोनामध्ये नेत्रदान चळवळी पूर्णत: थंड झाली होती. परंतु आता नेत्रदान चळवळीचे काम पुन्हा जोमाने सुरू झाले आहे. मागील पाच वर्षांत जिल्ह्यातून ३१८ जणांनी नेत्रदान केले. त्यामध्ये ६३६ बुबुळ नेत्रपेढीमध्ये जमा झाली. त्यातून ३६८ जणांना नेत्ररोपण करणयात आले. एकूण ११ हजार ४५५ जणांनी नेत्रदान संकल्प अर्ज भरून दिला आहे. त्यामध्ये पुरुषांबरोबर महिलाही तितक्याच सहभागी झालेल्या आहेत. संपूर्ण जागांमध्ये अंध लोकांपैकी एक चतुर्थांश लोक भारतात आहेत. त्याची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे.त्यामध्ये मोतीबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्यांचे प्रमाण ६० ते ७० टक्के आहे. राहिलेल्या ३० टक्के अंध व्यक्तींपैकी जवळ जवळ २५ टक्के लोकांना डोळ्यांमध्ये फूल पडल्यामुळे अंधत्व येते. अशा व्यक्तीमध्ये प्रामुख्याने काम करणाऱ्या तरुण माणसांचे प्रमाण जास्त असते.

नेत्रदानासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा : नेत्रदान ही एक चळवळ आहे. नेत्रदानाचे संमती पत्र भरून देताना शक्यतो सर्व कुटुंबीयांनी हा संकल्प संयुक्तरीत्या करणे आवश्यक आहे. कारण आपल्या नेत्रदानाचा उपयोग आपल्या मृत्यूनंतर होणार आहे. त्यासाठी नातेवाइकांची संमती आवश्यक असते. जिवंतपणी अपण नेत्रदानाचे इच्छापत्र भरून दिले असले तरी नातेवाइकांनी परवानगी दिल्याशिवाय डोळे घेता येत नाहीत. त्यासाठी सर्वाचा सहभाग महत्त्वाचा आहे. नेत्रदान करण्यासाठी विकास लिंगराज ८४२१२२४२४३ वर संपर्क करावा.

बातम्या आणखी आहेत...