आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार:आंदोलनस्थळी 50 दिवसांनी लागलेले आमदारांचे पाय शेतकऱ्याने काकुळतेने धरले

दक्षिण सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंदोलनाच्या ५० व्या दिवशी आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी शेतकऱ्यांची भेट घेतली. एक गुंठाही जमीन जबरदस्तीने घेतली जाणार नाही. एमआयडीसी म्हणून उताऱ्यावर झालेली नोंद कमी करण्यास वेळ लागेल. ते माझ्या हातात नाही. पण निश्चितच नाव कमी करू, असे आश्वासन दिले. मात्र, शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली.मंद्रूप येथील नियोजित एमआयडीसीसाठी जमीन देण्यास विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांनी उताऱ्यावरील एमआयडीसी नाव कमी करावे. या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेल्या २१ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे.

आमदार देशमुख म्हणाले, मंद्रूप भागाचा विकास व्हावा. तरुणांना रोजगार मिळावा. यासाठी एमआयडीसी मंजूर करून घेतली. पण यासाठी जमीन देण्यास काही जणांचा विरोध आहे. उद्योग व महसूल विभागाच्या बैठकीत नाव कमी करण्याविषयी निर्णय होईल. त्यासाठी थोडा वेळ लागेल.

शेतात जाण्यास धीर होत नाही : प्रवीण कुंभार यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडली. महादेव कुंभार यांनी ‘शेतात जाण्यास धीर होत नाही. आमची शेती घेऊ नका’, अशी पोटतिडकीने विनवणी केली. अमोगसिद्ध काळे या शेतकऱ्याने तर ‘आमची जमीन घेऊ नका’ म्हणत आमदार देशमुख यांचे पाय धरले.

तर राजकारण सोडेन : म्हेत्रे उताऱ्यावरील नाव कमी करण्याचे आश्वासन आमदार सुभाष देशमुख यांनी दिले आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर मी राजकारण सोडून देईन, असे आवाहन माजी सभापती गुरुसिध्द म्हेत्रे यांनी शेतकऱ्यांना केले.

बातम्या आणखी आहेत...