आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्रोळीतील घटना:आईवर कुऱ्हाडीचा घाव घालणाऱ्या बापाचा झाडास बांधून केला खून

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतावर काढलेले कर्ज फेडण्यावरून ६० वर्षांच्या वृद्धाने पत्नीला कुऱ्हाडीने मारून जखमी केले. रक्तबंबाळ आईला व बहिणीला पाहून संतापलेल्या मुलाने व मेहुण्याने त्यास वस्तीसमोरील नारळाच्या झाडाला बांधून ठार केले. ही घटना अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर येथे १३ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. मंद्रूप पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

शिवाजी बलभीम थोरात (वय ६० रा. अंत्रोळी ता. दक्षिण सोलापूर) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. मृत शिवाजी यांची अंत्रोळी येथे जामगाव रस्त्यावरील शेतात वस्ती आहे. कर्ज फेडण्यावरून शिवाजीने कुऱ्हाडीने पत्नीच्या पाठीवर वार केला. रक्तबंबाळ सासूला पाहून सून पूजा हिने पती तानाजी थोरात यास फोनवरून माहिती दिली. काही वेळात मुलगा तानाजी घटनास्थळी येऊन वडिलाला नारळाच्या झाडाला दोरीने बांधले. काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर उपचारासाठी आईला घेऊन मंद्रूपकडे निघाला.कंदलगावात मामा भीमराव जाधव यांना घटनेची माहिती दिली. वडिलांना वस्तीवर मी झाडाला बांधले आहे त्याला जाऊन चांगली अद्दल घडव, असे सांगितले. त्यानुसार भीमराव शिवाजीला झाडास बांधलेल्या अवस्थेत लाकडाने बेदम मारले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पुरावा दडपण्यासाठी केला होता बनाव, पोलिसांनी लावला छडा
आईला मारल्याने संतापून वडिलांना झाडाला बांधून मारल्याचे तानाजी यांनी कबूल केले. भीमराव जाधव यांनीही शिवाजीला मारल्याचे पोलिसांना सांगितले. खून दडपण्यासाठी दुचाकीवरून पडल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिस तपासात वास्तव समोर आले. संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. पोलिसांनी तानाजी यास घटनेदिवशीच ताब्यात घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...