आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • The Flyover Will Be The Entrance To The ST, Planning To Make An Entry Along The Side Of The Workshop; It Will Take Years After The Land Acquisition Process, The Old Workshops Will Also Be Removed |marathi News

नवा बदल:उड्डाणपुलामुळे एसटीचे प्रवेशद्वार जाणार, वर्कशॉपच्या बाजूने एंट्री देण्याचे नियोजन; भूसंपादनाच्या प्रक्रियेनंतर वर्ष लागणार, जुने वर्कशॉपही हटणार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर एसटी स्थानकाचे प्रवेशव्दार बंद होऊन त्याठिकाणी रॅम्प उभारण्यात येणार आहे. शिवाय जुने एसटी स्टँड प्रवेशद्वार आणि लातूर, तुळजापूर, बार्शीचे फलाट तसेच एसटीची वसाहत आणि वर्कशॉप अशा जवळपास सहा ते सात हजार स्क्वेअर फुटाच्या जागेही बदल होणार आहेत. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्यक्षात उड्डाणपुल झाल्यानंतर पूर्वीचे रूप बदलून एका नव्या रूपामध्ये एसटी स्थानक पाहायला मिळणार आहे.

प्राथमिक स्तरावरील कामाला सुरुवात झाली असून किमान वर्षभराचा तरी कालावधी लागणार आहे. जमिनीची मोजणी, त्याचे मूल्यांकन करण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. याकरिता मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी यांची तयारी सुरू आहे. एसटी स्थानकाच्या पाठी मागच्या बाजूला असलेल्या वर्कशॉप (कार्यशाळा) परिसरातही बदल होणार आहेत. एसटीची ही कार्यशाळा ५० ते ६० वर्षापूर्वीची आहे. नव्या बदलामुळे अाता ही कार्यशाळाही हलवावी लागणार आहे.

६ ते ७ हजार चौरस फूट जागेत बदलाची शक्यता
उड्डाणपुलामुळे एसटी स्थानक परिसरात बदल होतील. एसटी स्थानक प्रवेशद्वार, लातूर तसेच तुळजापूर फलाट, कर्मचारी वसाहत आणि वर्कशॉप परिसर अशा सहा ते सात हजार चौरस फूट जागेत बदल होणार आहेत. उड्डाणपुलावरून एसटी खाली उतरून वळसा घालून एसटीच्या पाठी मागच्या दिशेकडून पुन्हा बाहेर पडतील.

विकासात्मक कामाचे स्वागतच, पण कोणताही प्रस्ताव नाही
एसटीचे सध्याचे प्रवेशद्वार त्याचा काही भाग आणि वसाहतीतील वर्कशॉपचा काही भाग भूसंपादनात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण याबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव सध्या आमच्यापर्यंत आलेला नाही. अर्थात जेव्हा येईल तेव्हा आम्ही नक्कीच स्वागत करू. कारण शहराच्या विकासासाठी जर एक काम होणार असेल तर त्याला हातभार लावणे आमचं कर्तव्य आहे.
विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर

भूसंपादनाची प्रक्रिया सुरू
जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या सूचनेनुसार आम्ही भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी मूल्यांकनाचे काम सुरू केले आहे. एसटीची स्थावर असलेली जागा भूसंपादनाच्या प्रक्रियेत जाणार आहे. त्याचे मूल्यांकन गुरुवारी करण्यात आले आहे.तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जाईल
मनोज ठाकरे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

बातम्या आणखी आहेत...