आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादौंड जवळील वळणावर नगरहून - पुण्याला जाणाऱ्या मालगाडीचा एक डबा घसरल्याने सायंकाळच्या सर्वच प्रवाशी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. हुतात्मा एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेससह चेन्नई मेल, कोणार्क व हैदराबाद एक्सप्रेसला दीड तासांचा उशीर झाला.
हुतात्मा एक्सप्रेस लोणीजवळ तर वंदे भारतला खडकीजवळ सुमारे तास ते दीड तास थांबवली गेली. रेल्वे प्रशासनाने गतीने मदतकार्य सुरू करून साडेआठ वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक सुरळीत केली.
नेमके काय घडले : दोन रुळांना जोडणाऱ्या फिशप्लेटवरून मालगाडीचा डबा घसरला. हे डबे छतरहित होते. अपघात कारणाचा तपास करत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
हुतात्माने उशीरा पोहोचल्याने सर्वकामे खोळंबणार.काही मुलीआणि महिलाएकटे प्रवासकरत आहेत त्यांना अडचणी येतील. - राहुल झिरपे, अभियंता
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.