आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती विसर्जन:मिरवणुकीतील भांडणाचा राग; तरुणाला मारहाण

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून ओंकार धर्मेंद्र मोहिते ( वय २२, उत्तर कसबा, सोलापूर) या तरुणाला १० सप्टेंबर रोजी मारहाण झाली आहे. हा प्रकार हळदे बॅन्डच्या बोळात शनिवारी रात्री घडली आहे. केतन माशाळकर, कौशिक माशाळकर, समर्थ माशाळकर (सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी मिळून ओंकार याला हळदे बॅन्डच्या बोळात लेझीम, हाॅकी, लोखंडी राॅडने मारहाण केले. यात जखमी झाला आहे. जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. हवालदार कामूर्ती तपास करत आहेत.

विजापूर नाका परिसरात दुचाकी चोरीला विजापूर नाका परिसरातील एक नंबर झोपडपट्टी जुना अंबाबाई देवी मंदिराजवळ राहणारे आहे गोपाळ संपत यांची दुचाकी चोरीला गेलेली आहे. १२ सप्टेंबर रोजी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. टीव्हीएस लुना ( एम एच १३ बीझेड ०४४३) घराजवळ हॅण्डल लॉक करून ठेवली होती‌. ती चोराने पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हवालदार शेळके तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...