आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात विशेषत: हद्दवाढ भागात दिवसाआड किंवा दोन दिवसांआड घंटागाड्या येतात. नागरिक वर्षाकाठी ६०० रुपये उपविधी कर देत असताना घंटागाडी रोज येत नाही. यासाठी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी घंटागाड्या दोन पाळ्यात पाठवण्याचे नियोजन केले.
तसा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापनाने तयार करून पाठविला. पालिका मुख्य लेखा विभागात फाइल अडकली आहे. बजेट अभिप्राय मिळत नसल्याने दुसऱ्या पाळीत घंटागाडी पाठवण्याचे नियोजन थांबले आहे. शहरात विशेषत: घरकुल, जुळे सोलापूरसह हद्दवाढ विभागात एक किंवा दोन दिवसाआड घंटागाडी येत असून, नागरिकांनी कचरा दोन दिवस घरात ठेवत आहेत.
पालिका मात्र घंटागाडी पाठवत नसल्याचे चित्र आहे. हद्दवाढ भागात दोन पाळ्यात घंटागाडी सोडण्याचा प्रस्ताव तयार करून पालिका आयुक्तांची मान्यता घेतली. यावर बजेट अभिप्रायसाठी मुख्य लेखापाल कार्यालयात फाइल अडकली आहे. नागरिक उपविधी करापोटी ६०० रुपये भरत असताना त्यांचे बजेट हेड तयार केले नाही. ती रक्कम इतर कामासाठी वापरले.
६०० रुपये घेता गाडी का नाही?
नागरिकांकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी दरवर्षी एका घरासाठी ६०० तर दुकानासाठी १२०० रुपये आकारणी केला जाते. तशी वसुली महापालिकेने सुरू केली पण कचरा उचलण्यासाठी रोज घंटागाडी पाठवली जात नाही.
दोन दिवसांत अभिप्राय मिळेल
कोठेच फाइल अडकलेली नाही. मुख्य लेखापाल कार्यालयाने काही कागदपत्रे मागितली ती दिली. ते लवकरच अभिप्राय देतील. दोन दिवसांत बजेट अभिप्राय मिळेल. -मच्छिंद्र घोलप, पालिका उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन
१५ व्या वित्त आयोगाचा निधी स्मार्ट सिटी हिश्श्यापोटी दिला
घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र व राज्य शासन १५ व्या वित्त आयोगातून यापूर्वी पैसे दिले. ती रक्कम घनकचरा व्यवस्थापनासाठी तरतूद करणे आवश्यक असताना मागील आयुक्तांनी या निधीचे पैसे स्मार्ट सिटी कंपनीकडे पालिका हिस्सा म्हणून दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे घंटागाडी कंत्राटी कर्मचारीसह इतर कामासाठी पालिकेस अडचण येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.