आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आश्चर्य:आष्टी येथे जन्माला आला चक्क एक डोळ्याचा बोकड, पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी

प्रतिनिधी/पापरी(सम्मेद शहा)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बोकडाला बाजूला दोन डोळे नसून मध्यभागी मस्तकावर एकच डोळा आहे.

आष्टी ता.मोहोळ येथिल पशुपालक श्रवण बाबुराव पवार यांच्या शेळीच्या पोटी एक डोळा असलेला बकरा जन्माला आला आहे. त्यास पाहण्यासाठी आष्टी परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी गर्दी करू लागले आहेत. आष्टी येथिल पशुपालक श्रवण बाबुराव पवार हे शेळी पालन करतात. त्यांच्या शेळीने या बोकडाला जन्म दिला आहे.

श्रवण बाबुराव पवार यांच्याकडे तीन शेळ्या आहेत. त्यातील एका शेळीने शनिवार दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी एक बकरी व एक बकरा अशा दोन पिलांना जन्म दिला. बकरी पिलाचे सर्व अवयव व्यवस्थित आहेत. बोकडाला मात्र बाजूला दोन डोळे नसून मध्यभागी मस्तकावर एकच डोळा असलेला निदर्शनास आले. ही घटना वाऱ्यासारखी आष्टी पंचक्रोशीत पसरली व हा विशेष बकरा पाहण्यासाठी बघ्यांची झुंबड ऊडाली होती. या बकऱ्यास पाहून शेतकऱ्यामधून आश्चर्य व्यक्त होत आहे. या संदर्भात पेनूर येथील पशुधन विकास अधिकारी व्ही बी गावडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले काही प्राण्यामध्ये जन्मजातच त्रुटी (कंजनायटल अनोमालिज) असतात त्यातीलच हा प्रकार असु शकतो.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser