आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी त्यांना सांगितलं होतं एकमेकांवर टीका करू नका पण त्यांनी ऐकलं नाही. चर्चा करा, मार्ग काढा. संबंध नसलेल्या गोष्टींवर काहीही आरोप करू नका. हे आंदोलन आता कारखान्याच्या सभासदांनी हाती घेतलं आहे. त्यामुळे आजही तुम्ही हे ओळखा. आंदोलन वा चुकीचे आरोप करणे सुरू आहे ते ताबडतोब थांबवा, नाहीतर तुम्हाला या शहरातही राहू देणार नाही, अशी थेट धमकी सिद्धेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी साेलापूर विकास मंचच्या आंदोलनकर्त्यांना दिली आहे.
हरित लवादाने सिद्धेश्वर कारखान्याचे गळीत हंगाम बंद करावेत, असा आदेश दिला आहे. विजापूर-सोलापूर रस्त्यावर हत्तूर येथे सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या सभासदांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे.
कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी चेअरमन यांनी कारखान्याची भूमिका मांडली. आज या रास्ता रोको आंदोलनाची गरज झाली आहे. आता हे आंदोलन जिल्ह्यातील कारखान्यांच्या सभासदांनी हातात घेतले आहे. महाराष्ट्र शासनापर्यंत आपले म्हणणे, आपला आवाज पोहोचवण्यासाठी हे आंदोलन आहे. शासनाने कारखाना बंद करण्याची नोटीस मागे घ्यावी, बोरामणी विमानतळाबाबत पाठपुरावा करावा, विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीबाबत निर्वनीकरण जमिनीचा निर्णय घ्यावा, होटगी विमानतळावरील १५ क्रमांकावरून विमानसेवा कशी सुरू करता येईल, याचा विचार शासनाने करावा, अशीही सूचना काडादी यांनी केली. कारखान्याच्या सभासदांचे हे आंदोलन आहे. शासनाने आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी काडादी यांनी केली. दरम्यान, जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या सिद्धेश्वर कारखाना सभासदांचे चक्री उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू होते.
आदेश धुडकावले, कारखाना सुरूच
हरित लवादाने गळीत हंगाम तातडीने थांबवण्याचे आदेश दिले, तशी नोटीसही प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. पण कारखान्याने गाळप बंद न करता उलट रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. दुसरीकडे विकास मंचकडून आंदोलन सुरूच आहे. सलग २५ व्या दिवशी आंदोलन सुरू आहे तर मंचच्या पदाधिकाऱ्यांनी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेत विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. यावर पालकमंत्री यांनी रविवारी बैठक घेण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले आहे.
३३ क्रमांकाची धावपट्टी वापरातच नाही
होटगी रोड विमानतळावर १५ व ३३ क्रमांकाच्या पावणेदोन किलोमीटरच्या दोन धावपट्ट्या आहेत. आतापर्यंत ३३ क्रमांकाची धावपट्टी कधीच वापरात नाही. कारण यामध्ये एनटीपीसी, बिर्ला एचटी कनेक्शन, शिवशाहीसह ३५ अडथळे आहेत. फक्त सिद्धेश्वरच्या चिमणीचाच बाऊ केला जातो. वरील सर्व अडथळे दूर करणे शक्यच नाही. त्यामुळे १५ क्रमांकाच्या धावपट्टीवरून विमानसेवा कशी सुरू करता येईल, याचा विचार सरकारने करावा, अशी सूचना काडादी यांनी केली.
आंदोलनामध्ये माजी आमदार शिवशरण पाटील, माजी सभापती इंदुमती अलगोंड-पाटील, अशोक देवकते, कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, संचालक गुरुराज माळगे, अमर पाटील, शिवानंद पाटील-कुडल, विद्यासागर मुलगे, प्रमोद बिराजदार, सिद्धाराम व्हनमाने, काशिनाथ कोडते, सुरेश झळकी, शिवशंकर बिराजदार, वसंत पाटील, विठ्ठल पाटील, सूर्यकांत पाटील, राजशेखर भरले, अण्णप्पा सतूबर, प्रा. व्ही. के. पाटील, बापूराव पाटील, श्रीशैल पाटील, ज्योत्यप्पा सिनेवडीयार, रमेश पाटील, भीमाशंकर बबलेश्वर, गोपाळ जंगलगी, महालिंग बिराजदार, मल्लिकार्जुन नरोणे, महादेव बिराजदार आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.