आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसभरातील कार्यक्रमांना गैरहजेरी:पालकमंत्री आले दारी अन् नाराजी सरली; मगच हालली खासा स्वारी सिद्धेश्वर तळी

चंद्रकांत मिराखोर | सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसभरातील पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमांना, भाजप मेळाव्याला गैरहजर असलेले भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी संध्याकाळच्या सिद्धेश्वर तलाव परिसरातील लेसर शोच्या लोकार्पण सोहळ्यास हजेरी लावली. तत्पूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी श्री. देशमुख यांच्या सिद्धलीला निवासस्थानी भेट देत त्यांची नाराजी दूर केली. त्यानंतर ते कार्यक्रमास आले.

एकाकी पाडण्याचा प्रयत्न? : सर्व घटनाक्रम व भाजपात सुरू असलेले हालचाली पाहता, आमदार विजयकुमार देशमुख यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होता. त्यावर विजयकुमार देशमुख यांनी मात केल्याची स्थिती आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षातील नेत्यांना या नाराज नाट्यावर पडदा टाकावे लागणार आहे. कारण शहर उत्तरमध्ये पालिका काँग्रेस सफाया करणारे विजय देशमुखांची नाराजी पक्षाला परवडणारे नाही.

बातम्या आणखी आहेत...