आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूरचे पालकमंत्री हे आठवडी बाजारासारखे आहेत, अशी शेलकी टीका भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा कलगीतुरा पाहायला मिळणार आहे. शहरातील नाले सफाई व विकास कामाबाबत पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची शुक्रवारी भाजप शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यानंतर आमदार देशमुख बोलत होते.
कोणाला भेटतात?
देशमुख म्हणाले की, महापालिका सभागृहात कामास मंजुरी देऊन कामाची यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठवली जाते. त्या कामाची अडवणूक पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून होते. सुचवलेले कामे त्यांनी शहरात फिरुन पाहावे, यासाठी त्यांना वेळ नाही. ते आठवडी बाजारसारखे आठवड्यातून एकदा येतात. आल्यावर कोणाला भेटतात माहित नाही.
राहिलेली कामे करणार
पावसाळापूर्वी शहरात नाले सफाई करावे यासह विकास कामाबाबत भाजपाचे शिष्टमंडळ पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना भेटले. आमदार विजयकुमार देशुमख, भाजप शहरध्यक्ष विक्रम देशमुख, सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, माजी नगरसेवक संजू कोळी, वंदना गायकवाड, सुरेखा काकडे, शिवानंद पाटील, अमर पुदाले आदी उपस्थित होते. कुंभारवेस, शेळगी, आवंती नगर, गणेश पेठ, रुपा भवानी परिसरात नाले सफाई झाले नाही ते करावे. ही कामे झाले आहेत, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. राहिलेले कामे करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
ड्रेनेज लाइनबाबत चर्चा
महापालिका सभागृहात सन 2022-23 सालच्या कामाची यादी मंजूर करून जिल्हा नियोजन समितीकडे पाठवल्यानंतर त्या कामास पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली. खासदार व आमदारांच्या कामाचे हक्क असताना ते डावलले जाते ते होऊ यासाठी आयुक्तांनी पालकमंत्र्यांना बोलावे, अशी सूचना आ. देशमुख यांनी केली. याबाबत आपण एकवेळ पालकमंत्री यांना बोलावे, अशी विनंती आयुक्त पी. शिवशंकर यांनी केली. याशिवाय करंजकर विद्यालयाचे जागा, हद्दवाढ भागातील ड्रेनज लाईन, शहरातील मराठावस्ती, बागले वस्ती येथील ड्रेनेज लाइनबाबत चर्चा झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.