आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासद्गुरू प्रभाकर महाराज यांच्या ६६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ५ ते ८ फेब्रुवारीपर्यंत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गुलालाचा मोठा कार्यक्रम ६ फेब्रुवारी रोजी रात्री १०.४५ वाजता सम्राट चौकातील मंदिरात पार पडणार आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बाळकृष्ण शिंगाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री प्रभाकर अनुसंधान या पोथीचे सामूहिक अनुष्ठान मीना जोशी यांच्या अधिपत्याखाली होणार आहे. दुपारी ४ वाजता भाविक वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ज्योतीराम महाराज चांगभले यांच्या संत ज्ञानेश्वर महाराज संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ३५ पखवाज वादन होईल. ६ फेब्रुवारीला अखंड नामजप सप्ताह, श्री गुरुगीता पारायण होईल.
सायंकाळी ६ वाजता ज्ञानेश्वर वाघमारे यांचा भजनसंध्या, तर रात्री ९ वाजता प्रकाश कोथिंबीरे आणि दत्तात्रय कुसेकर यांचे सांप्रदायिक भजन होईल. त्यानंतर रात्री १०.४५ वाजता गुलालाचा कार्यक्रम होईल. सर्व कार्यक्रमांत भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी केले. यावेळी दत्तात्रय देशमुख, बाळकृष्ण शिंगाडे, वसंत बंडगर, वामन वाघचौरे, मोहन बोड्डू, निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते.
८ फेब्रुवारीला मिरवणूक निघेल ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता पोलिस उपायुक्त विजय कबाडे त्यांच्या हस्ते भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप होईल. ८ फेब्रुवारी रोजी मंदिरापासून रथ निघेल. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता पालखी पूजा होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.