आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील एका नामवंत डॉक्टरच्या माेबाइलवर एक संदेश येताे, ‘५० जणांचे हृदयराेग तपासणी करावयाची आहे. त्याचा खर्च किती येईल?’ डॉक्टरांनी त्याला माहिती दिली. हॅकरने त्यांच्या फाेन-पे पैसे पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर व्हिडिओ कॉल सुरू केला. त्याच्या संवादात डॉक्टरांच्या बँक खात्यातूनच १ लाख ३० हजार रुपये कधी गेले, हे त्यांनाच कळले नाही.
हा विचित्र प्रकार १९ जुलै २०२२ राेजी घडला. साेमवारी सदर बझार पाेलिस ठाण्यात त्याची फिर्याद नाेंद झाली. डॉ. सत्यशाम श्रीराम ताेष्णिवाल (वय ५२, रा. रामलाल चाैक, रेल्वे लाइन्स, साेलापूर) यांची ही फसवणूक झाली. त्यांनी फिर्यादीत म्हटले की, माेबाइलवर एक संदेश आला. त्यावर क्लिक करताना व्हाॅट्सअॅपवर आधार कार्ड, मिलिटरी आयकार्ड आणि पॅनकार्डचे फाेटाे दिसले. त्याच्या खाली सतीश बलवीर सिंग असे नाव हाेते. मी एक्स सर्व्हिसमॅन बाेलत आहे, असे म्हणत फाेन-पे सुरू करण्यास सांगितले. व्हिडिओ कॉल सुरू असताना त्याने डॉ. ताेष्णीवाल यांना १०० रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानंतर डॉक्टरांच्या आयसीआयसीआय बँक खात्यावर २०० रुपये जमा केले. ही रक्कम जमा झाल्याची खात्री करण्यास सांगितले. त्यानंतर डॉक्टरांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून १ लाख ३० हजार रुपये काढल्याचा संदेश आला. ओटीपी दिलेले नसतानाही हे पैसे गेले कसे हेच त्यांना कळले नाही. संबंधित व्यक्तीस त्यांनी लगेच संपर्क केला. त्याचा माेबाइल बंद लागत हाेता. डॉक्टरांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पाेलिसांत धाव घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.