आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:सिद्धेश्वर कारखान्याच्या ‘इसी’ ची सुनावणी पुढे

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने राबवलेल्या विस्तारीकरण प्रकल्पाला ‘एन्व्हायर्नमेंट क्लिअरन्स’ (ईसी) नसल्याच्या मुद्द्यावर बुधवारी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी हाेती. ती पुढे गेल्याची माहिती कारखान्याचे माजी तज्ज्ञ संचालक संजय थाेबडे यांनी दिली.

विस्तारीकरण प्रकल्प राबवताना कारखान्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘पर्यावरणीय अनुमती’ (इसी) मिळवलेल्या नाहीत, अशी तक्रार थाेबडे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे केली. पुण्याच्या पश्चिम विभाग लवादाकडे त्यावर सुनावण्या झाल्या. पर्यावरणीय अनुमती न घेता, विस्तारीकरण प्रकल्प कार्यान्वित केलाच कसा? असा प्रश्न उपस्थित करून लवादाने कारखान्याच्या कृत्यावर ताशेरे ओढले. ‘पर्यावरणीय अनुमती’ मिळवूनच कारखाना सुरू करा, असे निर्देश दिले. त्यावर कारखान्याने सर्वाेच्च न्यायालयात अपील केले.