आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजे:पवित्र रमजान महिन्यास सुरुवात, मुस्लिम बांधवांचे आजपासून रोजे

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शनिवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने इस्लामी कालगणनेतील रमजान महिन्याला सुरुवात झाली. रविवारपासून मुस्लिम बांधव रोजे (उपवास) धरण्यास सुरुवात करतील. चंद्रदर्शन झाल्याची घोषणा शहर काझी मुक्ती सय्यद अमजदअली काझी यांनी रात्री केली.

मगरिब (सायंकाळ)ची नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी मशिदीतून बाहेर पडत आकाशाकडे नजरा खिळवल्या. इवलीशी चंद्रकोर दिसल्यानंतर आनंद व्यक्त करत पवित्र रमाजान मास आरंभाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. गळाभेट देत आनंद व्यक्त करण्यात आला.

महिलांनी घरांच्या गच्चीवर चंद्र पाहण्याचा आनंद लुटला. चंद्रदर्शन झाल्यानंतर रात्री साडेआठनंतर विशेष तरावीहची नमाज प्रत्येक मशिदीमध्ये अदा करण्यास सुरुवात करण्यात आली. ती काही ठिकाणी दहा दिवस तर काही ठिकाणी तीस दिवस रोज रात्री चालणार आहे. व्यापारी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी काही ठिकाणी दहा दिवसांच्या तरावीह नमाजचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रदर्शन झाल्यानंतर विजापूर वेस, पंजाब तालीम, साखर पेठ, किडवाई चौक, बेगम पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, शास्त्रीनगर, मौलाली चौक, नई जिंदगी आदी सर्व मुस्लिमबहुल भागांमध्ये उत्साह दिसून आला.

बातम्या आणखी आहेत...