आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:आपल्या लोकांनी केलेला सत्कार वेगळा आनंद देतो : वनिता खरात

सोलापुर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझं माहेर सोलापूरअंतर्गत महिलांचा गौरव

आपल्या आयुष्यात कोणत्याही पदावर जाणे, आपल्या लोकांनी, आपल्या गावातल्या लोकांनी केलेला सत्कार हा जगावेगळा आनंद देतो, अशा भावना प्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात यांनी व्यक्त केल्या.

"माझं माहेर सोलापूर' या कार्यक्रमांतर्गत मूळच्या सोलापूरच्या अन् आता कामानिमित्ताने सोलापूरच्या बाहेर असणाऱ्या महिलांचा शनिवारी गौरव करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर जे इव्हेन्टच्या संयोजक जयलक्ष्मी जयतीर्थ पडगानूर तसेच सत्कारमूर्ती उपस्थित होत्या. यावेळी सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या वेळी खरात म्हणाल्या, "आपल्या अभिनय प्रवासामध्ये हुतात्मा स्मृती मंदिरचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. लग्न झाल्यानंतर महिला वेगवेगळ्या ठिकाणी जातात. पण सासरी गेल्यानंतरही त्यांचे कर्तृत्व थांबत नाही. मला पुरस्कारामुळे पुढील कामास बळ मिळाले.' प्राणिता कुलकर्णी यांनी या पुरस्कारामुळे आजवर केलेल्या कष्टाचा यथोचित मान आहे, असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन मंजुषा घाडगे यांनी केले. या वेळी लता मंगेशकर यांच्या अतुलनीय गाण्यांचा नजराणा पेश करण्यात आला. त्याला भरभरून दाद मिळाली.

यांचा झाला गौरव
श्वेता नरखेडकर, कमलादेवी आवटे, स्मिता पाटील, अंजली जोगळेकर, सोनाली बोरकर, संध्या गवई, मनीषा भट, प्रणिता भोसेकर, डॉ. जयश्री शिंदे.

बातम्या आणखी आहेत...