आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांना आयुर्वेदाच्या शिक्षणाने आपल्याला अनेक क्षेत्रात कार्य करता येतो. नावलौकिक मिळवता येतो. आयुर्वेदाला राजाश्रय मिळत असल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थी आणि पालकांनीही संस्था, महाविद्यालयाविषयी आपुलकी, जिव्हाळा, प्रेम जपला पाहिजे. असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अरविंद दोशी यांनी व्यक्त केले.
शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व संस्थेची ओळख करून दिली. या वेळी व्यासपीठावर विश्वस्त डॉ. आदर्श मेहता, डॉ. महावीर शास्त्री, प्राचार्या डॉ. वीणा जावळे, उपप्राचार्य डॉ. शांतिनाथ बागेवाडी, प्रशासकीय अधिकारी अनुप दोशी उपस्थित होते. प्रा. डॉ. महावीर शास्त्री यांनी शिष्योपनीय संस्काराचे महत्त्व आणि भारतीय आश्रम व्यवस्थेत गुरू-शिष्य परंपरेला भाग असल्याचे सांगून शिष्यत्व धारण करून ज्ञानार्जन करण्यास सांगितले. डॉ. गायत्री देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दीपाली मगरे यांनी आभार मानले.
जैन तत्त्वज्ञानानुसार दानाचे महत्त्व ओळखून सेवा करण्याची शिकवण
संस्थेचे विश्वस्त डॉ. आदर्श मेहता यांनी संस्थेची १०४ वर्षांची उज्ज्वल परंपरा आणि संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक क्षेत्रात संस्थेच्या माध्यमातून केले जाणारे कार्य, सेवा, रसशाळेच्या माध्यमातून तयार होणारी शुद्ध औषधे आणि मुनी व त्यागींची सेवा करण्याचे घेतलेले व्रत त्यांची चिकित्सा व उपचार करीत याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांनीही समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने आपणही जैन तत्त्वज्ञानानुसार औषध दानाचे महत्त्व ओळखून सेवा करण्याची संधी आपणाला आयुर्वेदाच्या शिक्षणामधून उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.