आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • The Lady Donated Three Acres Of Land To The Society Bhoomipujan Of The Vastu Work Of Mangal Office By The Senior Trustees Of The Organization

महिलेने दान केली तीन गुंठे जागा समाजाला दान:मंगल कार्यालयाच्या वास्तूच्या कामाचे संस्थेच्या ज्येष्ठ विश्वस्तांच्या हस्ते भूमिपूजन

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घोंगडे वस्ती भाजी मंडईच्या रस्त्यालगत असलेल्या तीन हजार चौरस फूूटची जागा कै. राजम्माबाई चंद्रय्या कोंडी यांनी पद्मशाली ज्ञाती संस्थेला दान केली. 2004 ला दान पत्र देऊन देखील आतापर्यंत समाज भवनाचे काम सुरू करण्यात आले नव्हते.

राजम्माबाई चंद्रय्या कोंडी यांच्या जागेतील भाडेकरुकडून कोर्टत केस दाखल करण्यात आली होती. मात्र, 2006 ला राजम्माबाई चंद्रय्या कोंडी निधन झाले, तो पर्यंत संस्थेने त्यांच्या औषधउपचाराचा खर्च केला होता. आज बाजार भावानुसार या जागेची किंमत दीड कोटींपर्यंत गेली आहे.

त्यावर मंगल कार्यालय बांधण्याचे काम संस्थेने आता हाती घेतले. संस्थेच्या ज्येष्ठ विश्वस्तांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन झाले. शुभकार्यासाठी ही वास्तु अल्पदरात देण्यात येईल, असे संस्था अध्यक्ष सुरेश फलमारी या वेळी म्हणाले.

कै. कोंडी या हयात असतानाच संस्थेकडे दानपत्र सुपूर्त केल्या. संस्थेने जागा ताब्यात घेतली होती. परंतु त्यावरील बांधकामच रखडले होते. अखेर त्याला मुहूर्त मिळाले. संस्थेचे विश्वस्त जनार्दन कारमपुरी, रामकृष्ण कोंडयाल, मुरलीधर अरकाल, नरसय्या इप्पाकायल, रामचंद्र जुन्नू यांच्या हस्ते नियोजित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. उपाध्यक्ष अशोक इंदापुरे, नगरसेवक श्रीनिवास कोंडी, माजी अध्यक्ष हरिबाबू येले आदी उपस्थित होते. सचिव संतोष सोमा यांनी आभार मानले.

या वेळी राजाराम गोसकी, महांकाळी येलदी, शिवराज दासी, राम गड्डम, राजमहेंद्र कमटम, दयानंद आडम, रमेश कैरमकोंडा, हरिनिवास बिल्ला, श्रीनिवास इप्पाकायल, सांभय्या वडलाकोंडा, विश्वनाथ मेरगू, चक्रधर अन्नलदास, नितीन मार्गम, श्रीनिवास गड्डम, नरसिंग चन्ना, वासुदेव इप्पलपल्ली, चंद्रकांत पासकंटी, मल्लिकार्जुन मारता, प्रभाकर गुडेली उपस्थित होते.

इमारतीचा​​​​​​​​​​​​​​ नियोजित खर्च 75 लाख

संस्था अध्यक्ष​​​​​​​ सुरेश फलमारी म्हणाले की, तीन हजार चौरस फूट जागेवर अडीच हजार फूटाचे बांधकाम होईल. त्यात सात व्यापारी गाळे असतील. मिनी मंगल कार्यालयात लग्नसोहळा, वाङनिश्चय आदी कार्यक्रमांसाठी सुसज्ज सुविधा असतील. समाज बांध‌वांना माफक दरात हे मंगल कार्यालय देऊ.

बातम्या आणखी आहेत...