आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:नोटिसा दिल्याने कुष्ठरुग्ण वसाहत रहिवाशांचा ठिय्या; महापालिकेत आयुक्त कार्यालयासमोर ठाण मांडले

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुमठा नाका येथील लेप्रसी कॉलनी येथील महापालिकेच्या जागेत असलेल्या नागरिकांना महापालिकेने नोटीस देत त्यांच्याकडील जागेच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. महापालिकेकडे जागेची कागदपत्रे असताना नागरिकांना त्रास का देता? असे म्हणत नागरिक आयुक्त पी. शिवशंकर यांना भेटण्यासाठी आले. चारजणांना भेटीसाठी आयुक्तांनी बोलावले. सर्वांना भेटा, असे म्हणत महिलांनी पालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. आयुक्त नागरिकांना भेटले आणि म्हणणे ऐकले.

लेप्रसी कॉलनीत काहीजण जागा गरजूंना विकत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांची खात्री करण्यासाठी तेथील मिळकतदारांना नोटीस दिली. कागदपत्रे भूमी व मालमत्ता विभागाच्या वतीने तपासण्यात येतील. ज्यांची कागदपत्रे नाहीत त्यांना नोटीस देण्यात येईल, असे आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले. या वेळी माजी नगरसेवक रियाज हुंडेकरींसह महिला उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...