आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाच्या बैठकाला गैरहजर राहिल्यास कारवाई:अनुपस्थित पदाधिकाऱ्यांची यादी प्रदेशाध्यक्ष पटोलेंकडे पाठवणार - काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. मोहितेंचा इशारा

सोलापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सत्तांतर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर आलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीला काँग्रेसचे काही पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर राहणे, पक्ष देईल तो कार्यक्रम भागामध्ये न करणाऱ्यांचा रिपोर्ट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते यांनी दिला.

काँग्रेस भवनमध्ये जिल्हाध्यक्ष डॉ. मोहिते यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आयोजिली होती. माजी आमदार रामहरी रुपनवर हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. बैठकीस माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, भीमाशंकर जमादार यांच्यासह तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

दांडीबहाद्दर पदाधिकाऱ्यांवर डॉ. मोहितेंनी निशाना साधला. बैठकीच्या निमित्ताने विचारांची देवाण-घेवाण होत असते. गैरहजर राहिल्यास, ती होणार कशी? असा प्रश्न उपस्थित केला. आषाढी वारी कालावधीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोलापूरच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी पक्षाच्या बैठकीस गैरहजर राहतात, त्यांचा रिपोर्ट तयार करून पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार यापुढील कालावधीत पक्षाच्या बैठकांना गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा रिपोर्ट तयार करून प्रदेशाध्यक्षाकडे पाठविण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. बैठकीनंतर गैरहजर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांसह, माजी आमदार अ‌ॅड. रुपनवर, माजी आमदार म्हेत्रे यांना मोबाइलवर संपर्क करून बैठकीला न येण्याची कारणं सांगितल्याची चर्चा काँग्रेस भवन परिसरात होती.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हा काँग्रेस तर्फे सर्व तालुक्यांमध्ये 75 किलोमीटरची गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच, शुक्रवारी (ता. 5) वाढत्या महागाईच्या विरोधात मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे, त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...