आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:जुना बोरामणी नाका ते गुरुनानक चौक रस्त्याचे नशीब फळफळले

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वभागातील जुना बोरामणी नाका ते गुरुनानक चौक रस्त्याचे नशीब फळफळले आहे. खड्ड्यांमुळे चाळणी झालेल्या या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय अखेर महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी सुमारे ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

शहरातील रस्ते खराब झाले असून, रस्ते प्रकरणी शनिवारी कुंभारवेस येथे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी आंदोलन केले. २५ कोटींचे १७ रस्ते महापालिका भांडवली निधीतून करण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेने मक्तेदार नेमला. ते काम वेळेवर केले नाही म्हणून मक्तेदारास नोटीस देण्यात आली. तरीही कामे सुरू केली नाहीत.

नई जिंदगीतील चार रस्ते
नई जिंदगी परिसरातील आनंद नगर, सुरवसे मित्र नगर आणि मंत्री चंडक नगर येथे माजी नगरसेविका वहिदाबी शेख यांच्या भांडवली निधीतून चार क्राँकिट रस्ते ८ ते ९ लाख रुपये खर्च करून करण्यात आले. ते रस्ते निकृष्ट असल्याची तक्रार शेख यांनी केले. त्यानुसार पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी रस्त्याची पाहणी केली. यावेळी सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, अभियंता हिबारे उपस्थित होते.

मक्तेदाराला नोटीस दिली
शहरातील रस्ते विषय ऐरणीवर येत असून, २५ कोटींचे १७ रस्ते करण्यास उशीर होत आहे. महापालिकेने मक्तेदारास नोटीस बजावली आहे. तीत ‘तुम्हाला काळ्या यादीत का घालू नये?’ अशी विचारणा केली.

बातम्या आणखी आहेत...