आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:महालक्ष्मी यात्रेला सुरुवात, देवीच्या गाण्यांचा झाला जागर ; म्हशी पळवण्याचा कार्यक्रम

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात गवळी समाजाचे कुलदैवतश्री महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे. आषाढ महिन्यात भरणाऱ्या दोन दिवसीय यात्रेस बुधवारपासून सुरू झाली. देवीच्या गाण्यांनी वातावरण भक्तिमय झाले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळपासून मंदिरात नैवैद्य दाखवण्यासाठी लगबग होती. सायंकाळी देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. यात दौंड, नगर, पुणे, विजापूर, पंढरपूर, येथील सहा मंडळांनी सहभाग नोंदविला. रात्री दहा वाजल्यानंतर रंगत वाढली. गाण्याचा कार्यक्रम ऐकण्यासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

गुरुवारी पहाटे पाच वाजता महाअभिषेक आणि महाआरती होणार आहे. महाअभिषेकाकरिता तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गोमुखातील पाणी आणण्याची परंपरा आहे. आज वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दुपारी महाप्रसाद वाटप होणार आहे. यानंतर दुपारी ३ ते ७ वाजता म्हशी पळवण्याचा कार्यक्रम होईल.

बातम्या आणखी आहेत...