आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटावरून वाद:‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो मराठा बांधवांनी साेलापूर येथे थांबवला

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘हर हर महादेव’ चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. सोमवारी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढले.

इतिहासाची मोडतोड करून चित्रपट बनवला आहे. त्यात बदल करून जनतेसमोर आणावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. तसे निवेदन चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व मराठा समाजाबद्दल लोकांमध्ये चुकीचा इतिहास दाखवून बदनामी केली जात आहे. हा शिवाजी महाराज व मराठा समाजाचा अपमान आहे. यामुळे चित्रपटांचे प्रदर्शन बंद करावे, बदनामीबाबत जाहीर माफी मागावी, चित्रपटात दाखवण्यात आलेला संवाद चित्रपटातून काढून टाकावा, अशी मागणी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष माउली पवार यांनी केली.

या वेळी राजन जाधव, गणेश डोंगरे, श्याम गांगर्डे, मंगेश जगताप, प्रशांत पवार, संदीप सुरवसे, प्रमोद भोसले, कपिल पवार, विकास राठोड, प्रदीप मुळे, किरण घुले, कपिल जाधव आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...