आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातेवाईकांची तक्रार:जुळ्या बहिणींच्या लग्नाची करता येणार नाही चौकशी ; कोर्टाने परवानगी नाकारली

अकलूज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माळेवाडी अकलूज येथे जुळ्या बहिणीबरोबर एकाने लग्न केल्याप्रकरणात अकलूज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात अधिक चौकशीसाठी अकलूज पोलिसांनी माळशिरस न्यायालयात परवानगी मागितली. मात्र न्यायालयाने सीआरपीसी १९८ प्रमाणे रक्ताच्या नातेवाइकांची तक्रार नसल्यामुळे तपास करता येत नाही, असे निर्देश दिले. त्यामुळे लग्नाच्या अफवांना विराम मिळाला.

माळेवाडी येथे दि. २ डिसेंबर रोजी रिंकी व पिंकी या दोन जुळ्या बहिणींबरोबर अतुल आवताडे या युवकाने विवाह केला. दोघींशी लग्न केल्याप्रकरणी दि. ३ डिसेंबर रोजी अकलूज पोलिस ठाण्यात राहुल फुलेने तक्रार दिली. त्यानुसार वर अतुलवर द्विभार्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अधिक चौकशीसाठी अकलूज पोलिसांनी माळशिरस न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.

माळशिरसमधील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांनी तक्रारदार हा संबंधित लग्न करणाऱ्यांच्या रक्ताचे नातेवाईक आहे का? असा सवाल करुन रक्ताचे नातेवाईक असेल तरच चौकशी करता येईल. अन्यथा या प्रकरणात चौकशी पुढे जाऊ शकत नसल्याने परवानगी नाकारली. त्यामुळे जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या अतुल आवताडे यास दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...