आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापत्रकारांकडे सर्वसामान्य जनता ही वेगळ्या भूमिकेतून पहात असते. त्यामुळे माध्यमांनी सत्य, समतोल, परखड, पारदर्शक व निष्पक्ष या तत्त्वांच्या आधारे कोणताही अनुनय न करता समाजाचे निखळ प्रबोधन करावे. तसेच आपल्या अधिकाराबरोबरच कर्तव्याचीही जाणीव ठेवावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केले. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या कल्पतरूकार कै. ल.गो. काकडे पत्रकारिता पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते.
पत्रकार : अधिकार आणि कर्तव्ये असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. पत्रकारितेशी संबंधित विविध उदाहरणे देत करमरकर यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. अध्यक्षस्थानी आकाशवाणी सोलापूर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र दासरी हाेते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष हरिभाऊ जतकर, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, सचिव श्याम जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पत्रकार रेवणसिद्ध जवळेकर यांना कल्पतरूकार ल. गो. काकडे पत्रकारिता पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये रोख संशोधन शिष्यवृत्ती, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी संजय पाठक यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह श्याम जोशी यांनी केले. आभार डाॅ. नभा काकडे यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.