आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:समानतेचा संदेश देण्याचे काम आश्रमातून केले जाईल, कक्कमरी मठाचे पीठाधिपती अभिनव गुरुलिंग जंगम स्वामी

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाती भेदभाव दूर करून आम्ही सारे एकच, असा संदेश देण्याचे कार्य हेवेदावे न करता सारे माझेच म्हणण्याचे कार्य या आश्रमाच्या वतीने केले जाते. याचे विजापूर जिल्ह्यात आम्ही साक्षीदार आहोत. हा मठ सूफी संताचा, सर्वधर्मसमभावनेचे प्रतीक म्हणून राहिल. देशामध्ये समानतेचा संदेश देण्याचे काम या आश्रमातून केले जाईल, असे वचन कक्कमरी मठाचे पीठाधिपती अभिनव गुरुलिंग जंगम स्वामी यांनी केले.

धार्मिक एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या सुफी संत हजरत सय्यदशाह हुसेन पीर कादरी चिश्ती (मनगुळी विजयपूर) सोलापूर येथे नव्याने उभारलेल्या आश्रमाच्या शुभारंभानिमित्त सर्वधर्मीय सद्गुरूंच्या साक्षीने दुसऱ्या दिवशी सत्संग पार पडला. यावेळी बसवलिंग महास्वामी, अभिनव महास्वामी हिरेमठ, रेणुका शिवाचार्य महास्वामी, ऋषानंद स्वामी, सप्यद बाशा, सुभानी हैद्राबाद, मल्लय्या स्वामी व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आदींची उपस्थिती होती. यावेळी लाकडामध्ये ज्योती आहे, हे पेटविल्या शिवाय समजत नाही. त्याचप्रमाणे मानवाच्या मन मंदिरातील ज्योती पेटवण्याकरिता गुरूंची आवश्यकता आहे, असे विचार बसवलिंग महास्वामी यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व धर्मगुरुंनी मिळून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.चांगले आचार-विचार अंगीकृत करून समाजामध्ये एकात्मता, विश्वबंधुत्वचा संदेश साऱ्या जगामध्ये देण्माचे कार्य आश्रमात केले जाईल. भक्तांनी सन्मार्गाचा अवलंब करून आपली पिढी सुसंस्कृत घडविण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. एफ. एच. इनामदार यांनी केले. आश्रमात समानता, एकात्मतेचा संदेश देण्याकरिता ध्वजारोहण करून कार्यमाची सुरुवात करण्यात आली. आश्रमावर पांढरा, केसरी, हिरव्या रंगांचे ध्वज लावण्यात आले आहेत. ते एकात्मतेचे प्रतीक दर्शवितात.

बातम्या आणखी आहेत...